सोसायट्यांमध्ये ‘मतदान करा, जागरूक नागरिक व्हा‘ जनजागृती!
By सुरेश लोखंडे | Published: April 26, 2024 05:04 PM2024-04-26T17:04:00+5:302024-04-26T17:04:25+5:30
स्त्रिया,पुरुष,ज्येष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या सख्यंने उपस्थित होते.
ठाणे : या लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात ठाणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी,यासाठी ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील गृहनिर्माण संकुलात, इमारती तसेच झोपडपट्टी परिसरात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार येथील लोढा स्टर्लिंग सोसायटी,कोलशेत रोड येथे मतदान जनजागृती करण्यात आली.
हा कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या परिश्रमातून केली जात आहे. स्वाभिमानी मतदार या संकल्पनेमधून मतदारांना मतदानाचे महत्व व स्वरूप स्पष्ट करून देण्यासाठी या साेसायटीमध्ये रहिवाश्यांच्या सहमतीने कार्यक्रम आयाेजित केला. त्यात स्त्रिया,पुरुष,ज्येष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या सख्यंने उपस्थित होते.