एका क्लिकवर मतदाराचे नाव

By admin | Published: February 19, 2017 04:23 AM2017-02-19T04:23:25+5:302017-02-19T04:23:25+5:30

महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावाधाव करण्याची गरज नसून ठाणे महानगरपालिकेने बनवलेल्या

Voter name with one click | एका क्लिकवर मतदाराचे नाव

एका क्लिकवर मतदाराचे नाव

Next

ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावाधाव करण्याची गरज नसून ठाणे महानगरपालिकेने बनवलेल्या ‘ठाणे व्होटर्स सर्च इंजीन’मुळे त्यांना एका क्लिकवर त्यांच्या नावाची माहिती मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज स्पष्ट केले आहे.
अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. महापालिकेच्या वतीने शनिवारी या सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, उपायुक्त (निवडणूक) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी बऱ्याच वेळा मतदारास आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही, याची कल्पना नसते. अशा वेळी मतदान केंद्रावर गोंधळ उडू नये, यासाठी जयस्वाल यांच्या संकल्पनेतून हे सर्च इंजीन तयार करण्यात आले आहे. कोणत्याही मतदारास http://tmcvotersearch.org या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही, याची माहिती मिळू शकते. या सर्च इंजीनमध्ये मतदाराचे नाव, मतदारसंघाचे नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्र मांक यापैकी काहीही टाइप केले तरी त्याची माहिती तसेच त्याच्या कुटुंबातील इतर मतदार असलेल्या व्यक्तींची माहिती, प्रभाग क्र मांक, मतदान केंद्राचा क्र मांक, त्याचा पत्ता तत्काळ मिळू शकतो. (प्रतिनिधी)

श्रीकांत सिंह ठाण्यात मुख्य निवडणूक निरीक्षक
- ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या तयारीचा शनिवारी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीकांत सिंह यांनी आढावा घेतला व निवडणुका सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने चोख जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
- पोलीस आयुक्त परमबीर सिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

Web Title: Voter name with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.