मतदारयाद्यांमधील घोळाने पक्ष, मतदार संभ्रमात
By admin | Published: February 21, 2017 06:01 AM2017-02-21T06:01:02+5:302017-02-21T06:01:02+5:30
मतदारयाद्यांमधील अनुक्रमांक बदलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतदारांना यादीतील आपले नाव शोधणे
ठाणे : मतदारयाद्यांमधील अनुक्रमांक बदलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतदारांना यादीतील आपले नाव शोधणे अवघड झाले आहे. परंतु, यावर उतारा म्हणून पालिकेने एक स्वतंत्र सर्च इंजीन सुरू केले आहे. असे असले तरी अनेकांची नावे या इंजीनमध्ये सापडेनाशी झाली आहेत.
याद्यांमधील घोळ अद्यापही संपुष्टात आला नसून पालिकेच्या निवडणूक विभागाने रविवारी तिसऱ्यांदा नव्याने यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु, आता या यादीची फोड कशी करायची आणि मतदारांपर्यंत त्यांच्या स्लीप कशा पोहोचवायच्या, असा प्रश्न सध्या सगळ्याच पक्षांना सतावू लागला आहे. त्यात यापूर्वी विविध पक्षांमार्फत घरोघरी वाटण्यात आलेल्या स्लीपमध्येदेखील घोळ असून मतदान केंद्र नेमके कोणते, याचे उत्तर मात्र मतदाराला सापडू शकलेले नाही.
महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आजही निवडणुकीच्या कामात घोळ सुरू आहेत. त्यात आता आणखी एक घोळ समोर आला आहे. मतदारयाद्या बनवताना आणि त्यांची प्रभागांनुसार फोड करताना काही चुका झाल्यामुळे त्या सुधारताना निवडणूक विभागाची मोठी डोकेदुखी झाली आहे. आजही अशा तक्रारी घेऊन अनेक जण ठाणे महापालिकेत घिरट्या घालत आहेत. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागातील मतदार भलत्याच प्रभागात आढळून आल्याने उमेदवार चिंतेत आहेत. तक्र ार करूनही त्यात सुधारणा झाली नसल्याने काही उमेदवारांनी हक्काचे मतदार गमावले आहेत. विकत घेतलेल्या मतदारयाद्यांनुसार मतदारांची ओळखपरेड सुरू केली असताना त्यांना त्यांचे मतदार केंद्र आणि मतदार क्र मांक समजावून सांगितले जात असताना पुन्हा नव्याने केंद्र क्र मांक आणि मतदार क्र मांक सांगावा लागणार आहे. आधीच चार प्रभागांत फिरताना उमेदवारांची दमछाक होत असताना निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांमुळे उमेदवार टेन्शनमध्ये आले आहेत. आता महापालिकेने पुन्हा तिसऱ्यांदा रविवारी मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु, त्या फोडायच्या केव्हा आणि त्यातील स्लीप मतदारापर्यंत वाटायच्या केव्हा, असा पेच पक्षांना सतावू लागला आहे. त्यातही यापूर्वीच भाजपा वगळता बहुतेक सर्वच पक्षांनी मतदारांना स्लीप घरपोच केल्या आहेत. यामध्येही घोळ असल्याची बाब समोर येत आहे. काहींमध्ये अमुक एक शाळा, तर काहींमध्ये दुसरीच शाळा आणि आता तिसऱ्यांदा प्रसिद्ध झालेल्या यादीत आणखी नवे मतदान केंद्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मतदातादेखील गोंधळला असून नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करायला जायचे आहे. निवडणूक विभागाकडून झालेल्या या गोंधळामुळे मतदारराजाला कदाचित मतदानाच्या दिवशी दोन ते तीन ठिकाणी रांगा लावाव्या लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, नव्याने प्रसिद्ध झालेल्या याद्या आणि मतदान केंद्रनिहाय याद्यांमधले अनुक्र मांक वेगवेगळे आहेत. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता गृहीत धरून नव्या यादीसोबत जुन्या यादीतलेही अनुक्र मांक देऊन गोंधळ कमी करता येईल का, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम आॅनलाइन करणे अवघड असल्याने मनुष्यबळाचा वापर करून ते करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.
(प्रतिनिधी)
मतदारांच्या घरी स्लिप पोहोचल्या नाहीत
मुंब्रा : मतदारांना त्यांचे मतदान कुठे आहे, याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या स्लिप मतदारांपर्यंत पोहोचवण्यात काही प्रभागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर अनुत्सुकता दाखवल्याने अनेक मतदार आपले मतदान नेमके कुठे आहे, याबाबत संभ्रमास्थेत आहेत. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदानाच्या स्लिपवर मतदारांचे नाव, मतदारयादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राचे ठिकाण, आदींचा उल्लेख असतो. त्यामुळे मतदारांची मतदान केंद्र शोधण्याची होणारी धावपळ वाचते. परंतु, या वेळी कार्यकर्त्यांनी स्लिप धाडण्याकडे दुर्लक्ष केल्याची सार्वत्रिक भावना आहे.