वाडा पंचायतीचे आरक्षण जाहीर

By admin | Published: May 24, 2017 12:53 AM2017-05-24T00:53:19+5:302017-05-24T00:53:19+5:30

या नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षण मंगळवारी सकाळी पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा

Wada Panchayat Reservation | वाडा पंचायतीचे आरक्षण जाहीर

वाडा पंचायतीचे आरक्षण जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : या नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षण मंगळवारी सकाळी पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा नियंत्रण अधिकारी विकास गजरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर केले.
वाडा नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून त्याचे आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जमाती, प्रभाग २ अनुसूचित जमाती, प्रभाग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ४ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ५ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, प्रभाग ७ सर्वसाधारण, प्रभाग ८ अनुसूचित जमाती स्त्री राखीव, प्रभाग क्रमांक ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक १० सर्वसाधारण, प्रभाग ११ अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग १२ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १३ सर्वसाधारण, प्रभाग १४ अनुसूचित जाती, प्रभाग १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, प्रभाग १६ सर्वसाधारण स्त्री आणि प्रभाग क्र मांक १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव याप्रमाणे जाहीर करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने एकूण नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. हे आरक्षण चिठ्ठ्यांनी काढले.
आरक्षणा संदर्भात काही हरकती असतील तर त्यांनी दिनांक ३ जून २०१७ पर्यंत जिल्हाधिकारी पालघर यांच्या कडे दाखल कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे, नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी, जिल्हा परिषदेचे गटनेते निलेश गंधे, भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे, बहुजन विकास आघाडीचे तालुकाअध्यक्ष अनंता भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती वरील तालुका अध्यक्षांनी दिली आहे.

Web Title: Wada Panchayat Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.