तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:01+5:302021-06-04T04:31:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार ...

Waiting for compensation of Rs 53 crore for Touke cyclone victims | तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

तौउके चक्रीवादळग्रस्तांना पावणेतीन कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौउके चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतमालाच्या नुकसानीसह २ हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्के घरे पूर्णपणे बरबाद झाली. दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळ्या अशी तब्बल २ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपयांची नुकसानभरपाई या चक्रीवादळग्रस्तांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

तौउके चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे. या वादळानंतर आता नुकसानीच्या पाऊलखुणा आणि जखमा आता भळभळू लागल्या आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर या १ हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यांच्या या ४८१ हेक्टरवरील मालाचे तब्बल ८६ लाख ३४ हजारांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या कालावधीत तीन जणांचा मृत्यू होऊन दोघे जखमी झाले आहेत. त्यापोटी मिळणाऱ्या १२ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या प्रतीक्षेत नातेवाईक आहेत.

मीरा-भाईंदरच्या ५२ कुटुंबांचे तब्बल दोन लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. २१ कच्च्या घरांचे, तीन पक्क्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यासाठी २२ लाख ८० हजारांची भरपाई शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय २ हजार १८१ घरांची अंशत: नुकसानभरपाई १ कोटी ३० लाख ८६ हजार मिळण्याची गरज आहे, तर २४५ पक्क्या घरांच्या अंशत: नुकसानीचे १४ लाख ७० हजार भरपाई या वादळग्रस्तांना मिळण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीची भरपाई वेळीच मिळाल्यास या नुकसानग्रस्तांना यंदाचा पावसाळा त्रासदायक होणार नाही. या नैसर्गिक नुकसानीसह कोरोनामुळे गेलेला रोजगार या वादळग्रस्तांच्या जीवावर उठलेला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातील आलेला आंबा, काजूसह रोपवाटिकांमधील रोपे, केळी, उन्हाळी भात आदींच्या नुकसानीचा जिल्ह्यातील १६४ गावांमधील एक हजार ३०२ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलीनेट तुटले, घरांवरी पत्रे उडाली आहेत. मच्छीमारी करणाऱ्या दोन बोटींचे पूर्णपणे नुकसान तर पाच बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची १४६ जाळ्या तुटल्यामुळे तीन लाख ८० हजार रुपयांचा फटका त्यांना बसला आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या तीन हजार २०० रोपांचे तर भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील चार हजार ४५० रोपांचे या वादळात नुकसान झाले. य़ामधील आंबा कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, साग, शेवगा आदी रोपांची मोठी रक्कम या पावसाळ्यात या शेतकऱ्यांना मिळाली असती.

...............

--

Web Title: Waiting for compensation of Rs 53 crore for Touke cyclone victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.