कोरोना रुग्णांची संख्या वाढली, आता महापालिका प्रशासनाला जाग आली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:29 PM2021-02-19T21:29:57+5:302021-02-19T21:39:28+5:30

हलगर्जी[पणा करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणार 

Wake up to the municipal administration came after the growing number of corona patients | कोरोना रुग्णांची संख्या वाढली, आता महापालिका प्रशासनाला जाग आली

कोरोना रुग्णांची संख्या वाढली, आता महापालिका प्रशासनाला जाग आली

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची काटेकोर अमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेसह पोलीस व अन्य संबंधित प्रशासनाची आहे

मीरारोड - कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाला आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या शासन नियमावलीची आठवण झाली आहे . आयुक्तांनी आज शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आधी दिलेली जबाबदारी पार न पाडणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांना एक वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची काटेकोर अमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेसह पोलीस व अन्य संबंधित प्रशासनाची आहे . मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणे , गर्दी टाळणे , आस्थापना - हॉटेल आदींना दिलेले निर्देश - नियमावलीचे काटेकोर पालन होते का नाही ? याची नियमित तपासणी करणे आदी जबाबदाऱ्या प्रशासन सह स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारे ,नगरसेवक  लोकप्रतिनिधी व राजकारणी आदींची देखील आहे. 

परंतु कोरोनाच्या रुग्णांची मध्यंतरी कमी होत चाललेल्या संख्ये मुळे बहुतांश प्रशासन - लोकप्रतिनिधी व राजकारण्यांसह लोकां मध्ये देखील मास्क न घालणे आदी अत्यावश्यक गोष्टीं कडे काणाडोळा केला गेला . मास्क न घालण्यासह निर्देशांचे पालन होत नसताना दुसरीकडे अनलॉक  मुळे लोकांची गर्दी वाढली . रेल्वे , बस , रिक्षा मध्ये देखील लोक मास्क न घालता फिरू लागले . फेरीवाले , हॉटेल , बाजार , मॉल , उद्यान, सार्वजनिक ठिकाणे येथे देखील निर्देशांचे उल्लंघन होत आहे . पालिका मुख्यालयात सुद्धा अनेक जण मास्क न घालता वावरतात . परंतु कार्यवाहीच केली जात नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढू लागला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्ये बाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चिंता व्यक्त केल्या नंतर आता प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे . मीरा भाईंदर महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात पालिका व पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती . यावेळी पोलीस अधिकारी आले नसले तरी पालिका अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्या साठी आधी दिलेल्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांची एक वेतन वाढ रोखण्याची नोटीस बजावण्यात यावी असे ठरले . नो मास्क नो इन्ट्रीचे स्टिकर तयार करून ते सर्व खाजगी , पालिका व शासकीय आस्थापनां मध्ये लावण्यात येणार आहेत . प्रभाग अधिकाऱ्याने रोज लग्न सभागृह , हॉटेल , मॉल , क्लासेस आदी पैकी किमान ३ ठिकाणी भेटी देऊन नियमावलीचे पालन होते कि नाही हे पहायचे आहे . उल्लंघन करणाऱ्याना पहिल्यांदा नोटीस देणे , दुसऱ्यांदा दंड आकारणे व तिसऱ्यांदा ७ दिवसा साठी आस्थापना बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. 

प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने मास्क न घालणाऱ्या किमान १०० लोकां कडून दंड वसूल करणे व मास्क वाटप करणे . प्रभाग अधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन घोषित करणे  व ३०० जणांची कोरोना चाचणी करून घेणे. कंटेनमेंट झोन मध्ये दर रविवारी सोडियम क्लोराइडची फवारणी करणे . चाचण्यांची संख्या वाढवणे , कोरोना कॉल सेंटरला मुदतवाढ देणे , अतिरिक्त आयुक्तांनी सोमवारी आढावा बैठक घेणे आदी निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत . 

सदर बैठकीस गैरहजर राहणाऱ्या सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव यांना नोटीस बजावली जाणार आहे . तर बैठकीत ठरलेल्या निर्णयांची अमलबजावणी न अधिकारी - कर्मचाऱ्यांना शिक्षेस सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे . 

Web Title: Wake up to the municipal administration came after the growing number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.