उल्हासनगर शहाड येथील संच्युरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पदयात्रा
By सदानंद नाईक | Published: August 14, 2023 05:55 PM2023-08-14T17:55:43+5:302023-08-14T17:56:20+5:30
उल्हासनगर शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने कंपनीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी दरवर्षीप्रमाणें कंपनीच्या विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढली.
उल्हासनगर : शहरातील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे कंपनी विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढण्यात आली. अशी माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली आहे.
उल्हासनगर शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने कंपनीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी दरवर्षीप्रमाणें कंपनीच्या विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढली. कंपनीचे सीईओ ओ. आर. चितलांगे यांच्या नेतृत्वाखाली सेच्युरी रेयॉन कंपनीच्या शहाड बिर्ला मंदीराच्या पायथ्याशी असलेले विश्रामभवन येथून गणपती बाप्पा मोरया म्हणत पदयात्राला सकाळी सुरवात झाली.
पदयात्रा म्हारळ वरप, कांबा, रायते मार्ग टीटवाळा येथील गणपती मंदिरात पोहचली. तेथे विधीवत पुजा करुन पदयात्रेचा समारोप करण्यात आली आहे. या पदयात्रेत सेच्युरी रेयॉन कंपनीचे (सी.ई.ओ.) ओ. आर. चितंलागे, दिग्विजय पांडे, श्रीकांत गोरे, मिलिंद भंडारकर यांच्यासह सेच्युरी रेयॉन कंपनीचे कर्मचारी परीवारासह मोठ्या उत्साहाने पदयात्रेत सहभागी झाले होते. अशी माहिती सेच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी पत्रकाराना दिली आहे.