मुंब्य्रात घरावर भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:16+5:302021-06-10T04:27:16+5:30
मुंब्रा : बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी एक वाजता कौसा भागातील घासवाला कम्पाउंडमधील मलिक टॉवर या इमारतीच्या ...
मुंब्रा : बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी एक वाजता कौसा भागातील घासवाला कम्पाउंडमधील मलिक टॉवर या इमारतीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळला. घटना घडली तेव्हा दत्तू गायकवाड हा वृद्ध घरामध्ये होता. सुदैवाने या घटनेत त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले. या भिंतीचा काही भाग यापूर्वीही कोसळला होता. त्यावेळी ती धोकादायक असल्याची तक्रार केली होती. या भिंतीमुळे बाजूच्या रुबी या इमारतीला धोका असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. ठाणे महापालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.
- सखल भागांना तलावाचे स्वरुप
दरम्यान, नालेसफाई व्यवस्थित न केल्याने अवघ्या काही तासांच्या पावसाने येथील नाल्यांमधील तसेच गटारांमधील पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे काही ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. नालेसफाईचा बोजवारा उडाल्याने दिव्यातील काही घरांमध्येही पाणी शिरले होते. तसेच रस्तेही जलमय झाले होते.