प्रभाग अधिकाऱ्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:52 AM2021-02-20T05:52:42+5:302021-02-20T05:52:42+5:30
मीरा रोड : राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांना माहिती आयुक्तांच्या आदेशानंतरही ...
मीरा रोड : राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांना माहिती आयुक्तांच्या आदेशानंतरही तब्बल तीन वर्षे अनधिकृत बांधकामाची माहिती न दिल्याने १० हजाराचा दंड ठोठावला आहे. दयानंद पालन यांनी १ मार्च २०१७ रोजी तत्कालीन प्रभाग समिती ६ चे प्रभाग अधिकारी बोरसे यांच्याकडे अनधिकृत बांधकामाबाबत माहिती अधिकारात अर्ज केला होता. परंतु अनधिकृत बांधकामांच्या सुनावणीची कागदपत्रे बोरसे यांनी न दिल्याने दयानंद यांनी २१ मार्च २०१७ रोजी प्रथम अपील आणि १५ एप्रिल २०१७ रोजी द्वितीय अपील दाखल केले होते. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त थँक्सी थकेकरा यांनी अर्जदारास अभिलेख निरीक्षणाची संधी देऊन ५०० पानांपर्यंतची माहिती समक्ष बोलावून मोफत द्यावी असे आदेश दिले होते. राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशा नंतरही बोरसे यांनी अर्जदारास माहिती न दिल्याने त्यांनी पुन्हा माहिती आयुक्तांकडे धाव घेतली होती.