उल्हासनगरात गोदामे बनली स्वच्छतागृहे; बराकीही भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:42 AM2018-04-02T06:42:13+5:302018-04-02T06:42:13+5:30

उल्हासनगरमधील गोदामांचा वापर थांबल्यानंतर त्यांचा ताबा वेगवेगळ््या बेकायदा धंदा करणाऱ्यांनी घेतला नसता तरच नवल! त्यामुळे तेथे फेरीवाले, दुकानदारांचा माल साठवणे, कचरा टाकणे, प्रसंगी स्वच्छतागृह म्हणून वापरणे असे उद्योग सुरू झाले आहेत. या गोदामांतील साहित्याची राजरोस चोरी सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधींची ही सरकारी मालमत्ता सर्वांच्या डोळ््यादेखत मातीमोल होताना दिसत आहे. त्यासाठी तेथे बंदोबस्त ठेवण्याची, गस्त वाढवण्याची गरज आहे.

 Warehouses built in Ulhasnagar, sanitary toilets; In the baroque lanes | उल्हासनगरात गोदामे बनली स्वच्छतागृहे; बराकीही भग्नावस्थेत

उल्हासनगरात गोदामे बनली स्वच्छतागृहे; बराकीही भग्नावस्थेत

Next


उल्हासनगरच्या कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरामागील बाजूला मुख्य गोदाम आहे. गोदामाचे कार्यालय सोडल्यास इतर दरवाजे काँक्रिटच्या भिंतीने बंद करण्यात आले. इमारतीच्या कार्यालयाच्या जागेचा वापर स्थानिक नागरिक स्वच्छतागृह म्हणून वापर करत आहे. गोदामाच्या याच कार्यालयात रात्रीच्यावेळी बेकायदा व्यवसाय सुरू असतात अशी परिस्थिती आहे. गोदाम परिसरातील संरक्षण भिंती पडल्या असून मागील खुल्या जागेत भंगार गाड्यांचा अक्षरश: खच पडला आहे. तर पुढील खुल्या जागेत महापालिकेने कचराकुंडी ठेवली आहे. इमारतीच्या दुसºया बाजूने फळविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. एकेकाळी संपूर्ण शहराला अन्नपुरवठा करणाºया गोदामांच्या इमारतींची दुर्दशा झाली आहे. येथे खुल्या जागेवर तयार झालेली कचरा कुंडी इतरत्र हलवा. तसेच भंगारातील गाड्यांची विल्हेवाट लावा, अशा प्रकारच्या मागण्या स्थानिक नागरिकांनी महापालिकेसह भारतीय खाद्य निगमकडे केली आहे.
मुख्य गोदामाव्यतिरिक्त तहसील कार्यालय परिसरात बॅरेकच्या असंख्य चाळींचा उपयोग अन्नधान्य साठा साठविण्यासाठी केला जात होता. त्याठिकाणीही अन्नधान्य साठविणे गेल्या अनेक वर्षापासून बंद झाले. वापराविना पडलेल्या गोदामांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून इमारतीच्या एका बराकीत राज्य सरकारचे भूमापन कार्यालय थाटले आहे. त्याचशेजारच्या दुसºया बराकीत अन्नधान्य साठवले जात होते. त्या इमारतीच्या एका बाजूच्या बराकीत सरकारी शिधावाटप कार्यालय आहे. गोदाम इमारतीची देखरेख, दुरूस्ती व पुनर्बांधणी वेळीच झाली नसल्याने इमारतींची दुरवस्था होऊन धोकादायक झाल्या आहेत.

शाळेच्या इमारतीची भग्नावस्था
शहरात विविध सरकारी भूखंड पडून असून त्यांच्यावर भूमाफियांची नजर आहे. कधीकाळी येथे सरकारच्या योजना राबवल्या जात होत्या. विस्थापित सिंधी समाजाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तांत्रिक शिक्षण शाळा सुरू केली होती. काळाच्या ओघात शाळा बंद पडली असून इमारत भग्नावस्थेत आहे. या भूखंडाची जागा पाच ते सहा एकरांची असून कॅम्प नं-४ येथील संतोषनगर-महादेवनगरात आहे. जागेच्या चारही बाजूने अतिक्रमण झाले असून त्यामधून प्रवेशद्बारही सुटलेले नाही. एक लहान रस्ता जाण्या-येण्यासाठी आहे. इमारतीमधील साहित्यासह दरवाजे-खिडक्यांची चोरले गेले. आता भिंती पाडून विटांचीही चोरी होते. भूखंड महापालिकेला मिळाल्यास, येथे प्रभाग समिती कार्यालय, महाविद्यालय, रूग्णालय सुरू करता येऊ शकेल.

विश्रामगृहाच्या इमारतीत गावगुंड
सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ ते ३० वर्षापूर्वी कॅम्प नं-५ परिसरातील टेकडी परिसरात विश्रामगृह बांधले होते. कालांतराने विश्रामगृहाच्या जागे भोवती झोपडपट्टी उभी राहिल्याने कोणीही विश्रामगृहात राहण्यात धजावत नव्हते. अखेर विश्रामगृह बंद करण्यात आले. ११ एकरच्या विस्तीर्ण उंच टेकडीच्या जागेत विश्रामगृह बांधले आहे. विश्रामगृहाची इमारत भग्नावस्थेत असून विश्रामगृहाच्या संरक्षण भिंतीसह प्रवेशद्बार तोडून गावगुंड, भूमाफिया अतिक्रमण करीत आहेत. याबाबतची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असूनही कारवाई शून्य आहे. मध्यंतरी महापालिकेने विश्रामगृहाच्या भूखंडाची मागणी करून तसा प्रस्ताव महासभेत मंजूर केला होता. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने भूखंडावर अतिक्रमण सुरूच आहे.

मद्यपी, गर्दुल्ले, भुरट्या चोरांचा वावर
गोदामाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या, जुने, विजेचे साहित्य आदींची चोरी सर्रास होत आहे. हे कमी म्हणून की काय, इमारतीच्या पडक्या भिंतीतून आत प्रवेश केला जातो. गर्दुल्ले, मद्यपी, भुरटे चोर आदींचे हक्काचे ठिकाण झाले असून मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतरही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने परिसरात गोदामेच नको, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवकांनी दिली.

जागेचा वापर
बेकायदा पार्किंगसाठी
शिधावाटप कार्यालयाला पुरवठा करणाºया अन्नधान्याची वाहने येथील खुल्या जागेत पार्क केली जातात. हळूहळू खाजगी वाहनेही येथे उभी राहू लागली. गोदामाच्या संरक्षण भिंती पाडल्या असून भिंतीलाही भगदाड पाडून गोदामात बेकायदा व्यवसाय सुरू आहेत. पोलिसांना बेकायदा पार्किंग व अनैतिक व्यवसायाची कल्पना असतानाही कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. गोदाम विभागाने खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केल्यास, जागेसह इमारत व साहित्य सुरक्षित राहिल. पण तशी कोणाची इच्छा दिसत नाही.

गोदामाच्या जागेवर अतिक्रमण
कॅम्प नं-५ गांधी रोड येथील बॅरेकच्या चाळीतील गोदामाच्या संरक्षण भिंती शेजारी अनेक बेकायदा दुकाने बांधण्यात आली. गोदामाच्या जागेवर अतिक्रमण होत असून ते सर्वांना दिसत असले तरी त्याची राज्य सरकारला कल्पना नाही. अशीच स्थिती राहिल्यास गोदामे फक्त कागदावर राहण्याची भीती आहे. तिन्ही गोदामांची अशीच स्थिती आहे. प्रबळ इच्छाशक्तीअभावी ही मालमत्ता मातीमोल होत आहे.

आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण
सुरूवातीला शहरात पाणीपुरवठा करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत होत होते. शहरात विविध ठिकाणी प्रधिकरण विभागाचे निवासस्थान असून खुल्या जागा आहेत. त्यापैकी कुर्ला कॅम्प येथील खुल्या जागेवर भूमाफियांनी भराव टाकला. तर कॅम्प नं-३ साई बाबा मंदिर येथील भूखंडावर खोटी सनद काढल्याची चर्चा आहे. प्राधिकारणाच्या खुल्या जागा व निवासस्थाने महापालिकेने ताब्यात घेतल्यास शहर विकासासाठी जागा मिळणार आहे. मात्र पालिकेच्या ७० टक्केपेक्षा जास्त आरक्षित भूखंडावर यापूर्वीच भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. इतर आरक्षित भूखंडही सुरक्षित नसल्याची चर्चा शहरात होत आहे.

Web Title:  Warehouses built in Ulhasnagar, sanitary toilets; In the baroque lanes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.