ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ताबा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 05:38 AM2018-11-13T05:38:02+5:302018-11-13T05:39:03+5:30

लवकरच प्रत्यक्ष हस्तांतर : आठ वर्षांनंतर वारकऱ्यांच्या हाती वाटपपत्र; न्यायालयाच्या संमतीने तिन्ही संस्थांना मिळणार ताबा

The Warkari Bhavan in Thane will finally get control | ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ताबा मिळणार

ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ताबा मिळणार

googlenewsNext

ठाणे : वारकºयांसाठी बांधलेले वारकरी भवन आठ वर्षांनी ज्येष्ठ नागरिक संघ, वारकरी मंडळ आणि अ.भा. मराठी नाट्य परिषदेला अखेर परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाट्य परिषद, ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या तिन्ही संस्थांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी त्यांना या वास्तूचे अधिकृत वाटपपत्र दिले. तसेच, सध्या ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या ताब्यात असलेले वारकरी भवन हे न्यायालयाच्या संमतीने या तिन्ही संस्थांच्या प्रत्यक्षात ताब्यात दिले जाईल, असे आश्वासनही दिले.

२००७ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या वारकरी भवनाचे भूमिपूजन केले होते. २०१० मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०११ मध्ये या वास्तूचे उद्घाटन केले होते. मात्र, वारकºयांना ही वास्तू हस्तांतरित करण्यात आली नव्हती. २०१६ मध्ये महापालिकेने ठराव मंजूर करून या वास्तूचा पहिला मजला ज्येष्ठ नागरिकांसाठी, दुसरा मजला संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघ आणि तिसरा मजला अ.भा. नाट्य परिषद, ठाणे शाखेसाठी राखीव ठेवला होता. ठराव संमत होऊन दोन वर्षे झाली, तरी संबंधितांना ताबा देण्यात आलेला नाही. दरम्यानच्या काळात ही वास्तू पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी महापालिकेने मागितली. त्यानंतर, २०१७ मध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे वारकरी भवनाची इमारत सहा महिन्यांसाठी वापरण्यास मिळावी, अशी मागणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने केली होती. त्यानुसार, महापालिकेमध्ये न्यायालयाला ही इमारत तात्पुरती वापरण्यास देण्याबाबत ठराव मंजूर झाला होता. या ठरावानुसार कालावधी पूर्ण होऊनही दीड वर्ष झाले आहे. याबाबत विचारे यांनी ज्येष्ठ नागरिक संघ, वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ आणि अ.भा. नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांना घेऊन ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यासोबत बैठक घेतली जाणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. तसेच, संबंधित संस्थांना अधिकृत वाटपपत्र देऊन या तिन्ही संस्थांनाही जागा देण्यात आल्याचे लेखी स्वरूपात सांगितले.

न्यायालयाला विनंतीपत्र देऊन सर्वांच्या भावना कळवण्यात येतील. न्यायालयाकडून ती जागा महापालिकेला मिळाल्यावर संबंधित संस्थांना प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच, या वास्तूचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च संबंधित संस्था करतील. तेथे ‘ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने’ असा फलक असेल, असे आदेशही यावेळी दिले. यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती समिती ठाणेचे प्रतिनिधी बळवंत कर्वे, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे वारकरी समाजाचे प्रतिनिधी दिनकर पाचांगे व नाट्य परिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर आदी उपस्थित होते.

राजन विचारे सुरक्षारक्षकांवरभडकले
आयुक्त कार्यालयात जाताना सुरक्षारक्षकांनी वारकºयांना अडवल्याने राजन विचारे भडकले. ‘ते वारकरी आहेत’ अशा शब्दांत सुनावत सर्वांना आत सोडण्यास सांगितले.

आयुक्तांना आषाढी वारीचे निमंत्रण
च्वारकºयांनी आयुक्तांच्या कार्यालयात ‘पुंडलिक वरदे जय हरी विठ्ठल, हर हर महादेव’ असा जयघोष करत प्रवेश केला. यावर्षी आषाढी वारीला तुम्ही आला नाहीत. पुढच्या वर्षी नक्की, या असे आग्रहाचे निमंत्रणही वारकºयांनी आयुक्तांना दिले.
च्त्याला आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. शेवटी, निघताना या वारकºयांनी पसायदान सादर केले. तेव्हा ‘तुमचे कार्यालय या जयघोषाने पावन झाले’ असे विचारे यावेळी आयुक्तांना म्हणाले.
 

Web Title: The Warkari Bhavan in Thane will finally get control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.