उन्हाचा पारा जोरात तरी वऱ्हाडी जोषात

By admin | Published: May 11, 2015 01:26 AM2015-05-11T01:26:37+5:302015-05-11T01:26:37+5:30

यंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

Warmth of sunshine to win wardrobe | उन्हाचा पारा जोरात तरी वऱ्हाडी जोषात

उन्हाचा पारा जोरात तरी वऱ्हाडी जोषात

Next

उमेश जाधव, टिटवाळा
यंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. असे असले तरी लग्नसराईत वर-वधुच्या हळदी समारंभ व मिरवणुकीत रात्रभर व दिवसा उन्हात डिजेच्या व बॅण्डच्या तालावर ताल धरत बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचे चित्र कल्याणच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पहावयास मिळते. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणातील बदलत्या उष्माघातावर मात करत वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नृत्य करून हाळदी व लग्न समारंभाचा आनंद लुटत आहेत.
लग्नसमारंभ म्हटलं की वधु- वराकडच्या मंडळींची मोठी धावपळ सुरू आसते. यंदा लग्नकार्यासाठी मार्च महिन्यात फक्त ५ , एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १० आणि जून महिन्यात अवघे ६ मुहूर्त आहेत, तेसुद्धा १२ जूनपर्यंत. पुढे १७ जूनपासून अधिक मास सुरू होत आहे. तेव्हा मार्च मिहना वगळता येत्या तीन महिन्यांत लग्नकार्यासाठी फक्त २० मुहूर्त आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मुहूर्तांवर लग्नकार्य उरकण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसते. अशा लग्न व हळदीसमारंभा करिता नातेवाईक अर्थात वऱ्हाडी आणि स्नेही हे आवर्जून आपली हजेरी लावत असतात. त्यामुळे हळदी व लग्नकार्यात आनंदाला उधाण आलेले असते. लग्नकार्यात इतर सर्व धार्मिक विधींसह हळदी समारंभाला विशेष महत्त्व असते. यावेळी रात्रभर डिजे व बँण्डच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्याचा आनंद लुटणारी वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळते.
दुपारी १२ वाजेनंतरचा उन्हाचा तडाखा तर सहनच होत नाही. असे असले तरी कल्याणशहरासह ग्रामीण व संपूर्ण जिल्हयÞात अशा वातावरणात देखील गावागावात व शहरात सोसायटींमध्ये रोज शेकडो लग्न सोहळे साजरे होत आहेत या सोहळ्याच्या हाळदी समारंभात घामाघुम होऊन नाचणारी वऱ्हाडी पहावयास मिळते. या वऱ्हाडींपुढे तापमानाचाही पारा फिका पडला आहे की काय, अशी शंका निर्माण होते.

Web Title: Warmth of sunshine to win wardrobe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.