अशी झाली महिनानिहाय गॅस दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:16+5:302021-09-03T04:43:16+5:30

* महिना दर (रुपयांत) १) जानेवारी - ...

This was the monthly increase in gas prices | अशी झाली महिनानिहाय गॅस दरवाढ

अशी झाली महिनानिहाय गॅस दरवाढ

Next

* महिना दर (रुपयांत)

१) जानेवारी - ६९४

२) फेब्रुवारी - ७८९

३) मार्च - ८१९

४) एप्रिल - ८०९

५) मे - ८०९

६) जून - ८०९

७) जुलै- ८३४.५०

८) ऑगस्ट - ८६५

९) सप्टेंबर- ८८४.५०

-------------,

२) सबसिडी बंद, दरवाढ सुरूच -

गॅसवर सबसिडी दिल्याचा गवगवा करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आता या बंद झालेल्या सबसिडीवर बोलतही नाहीत. बंद केलेल्या घरगुती गॅसच्या सबसिडीविरोधात कोणीच आवाज उठविला नाही. या गॅसच्या एकूण किमतीवर दरमहा ६० ते ७० रुपये बॅंक खात्यात सबसिडी म्हणून जमा होत असे; पण वर्षभरापासून ही रक्कम दिली जात नाही.पण दरमहा २५ ते ३० रुपये सिलिंडरच्या किमतीवर वाढ करून अन्याय केला जात असल्याचे ऐकायला मिळत आहे.

--------------

३) व्यावसायिक सिलिंडरवर मात्र फारसी वाढ नाही-

हॉटेल, कॅंटीन, आदी व्यावसायिकांना दिले जाणारे सिलिंडर सध्या एक हजार ५८० रुपयांस मिळत आहे. या आधीही त्यावरील दरात तीन रुपये कमी झाले. आताही त्यावर फारसी भाववाढ झाली नसल्याचे ऐकविले जात आहे.

------------------------

* आता चुली पेटवायच्या का ?-

1) प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईने कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे रोजगार गेले आहेत. गहू, तांदूळ, कडधान्याचे भाव वाढले असून, तेल २०० ते २५० रुपये झाले आहे. गॅसची भाववाढ झाल्याने तब्बल एक हजार रुपये त्यावर खर्च होत आहे. त्यामुळे आता आम्ही फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या का? गॅसचे भाव कमी न केल्यास आम्ही मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून भारतीय महिला फेडरेशनच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करणार आहे.

- निर्मला पवार

अध्यक्षा- भारतीय महिला फेडरेशन, ठाणे.

-----------

२) गॅसचे भाव वाढायलाच नको. लाॅकडाऊनमध्ये आधीच कामधंदा, नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात गॅसची भाववाढ व महागाई करून सामान्य लोकांचा अंत पाहत आहे; पण त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार. गॅसची भाववाढ केली. आता चुलीवर स्वयंपाक करावा लागणार; पण आता त्यासाठीही लाकडे मिळत नाहीत. गरीब, सामान्य माणसाची या महागाईने पिळवणूक केली जात आहे.

- सायली पवार, ठाणे

--------

Web Title: This was the monthly increase in gas prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.