वाशिम जिल्हय़ाला मिळणार १00 रोहित्र!

By admin | Published: November 7, 2016 02:34 AM2016-11-07T02:34:32+5:302016-11-07T02:34:32+5:30

मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांचे निर्देश; आमदार पाटणी यांचा पाठपुरावा.

Washim district gets 100 Rohitas! | वाशिम जिल्हय़ाला मिळणार १00 रोहित्र!

वाशिम जिल्हय़ाला मिळणार १00 रोहित्र!

Next

वाशिम, दि. ६-आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची ५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भेट घेऊन जिल्हय़ाकरिता किमान १00 रोहित्र उपलब्ध करण्याची मागणी केली. त्याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी वाशिमसाठी अमरावती व अकोला येथून १00 के.व्ही.चे. १00 रोहित्र उपलब्ध करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.
जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात वीज रोहित्र नादुरुस्त आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकरी विहीर, धरणात पाणी असूनसुद्धा आपल्या पिकाला वाचविण्यास असर्मथ ठरत आहे. जिल्हय़ात वीज रोहित्र नादुरुस्त पडण्याच्या संख्येतही मोठी भर पडली आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबई येथे भेट घेऊन वाशिम जिल्हय़ातील शेतकर्‍यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. आपण आज जर शेतकर्‍यांच्या हिताकरिता तत्काळ रोहित्र उपलब्ध केले नाही, तर जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर मोठे संकट येऊन त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिली. सोबतच जिल्हय़ाकरिता इतरत्र ठिकाणावरून १00 रोहित्र उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना वाशिम जिल्हय़ाकरिता इतरत्र ठिकाणावरून १00 रोहित्र उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. लवकरच हे रोहित्र उपलब्ध होणार असून, यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Washim district gets 100 Rohitas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.