मनपाच्या स्वच्छतागृहाच्या पाण्याने खासगी वाहनांची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:22+5:302021-03-01T04:47:22+5:30

मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून चक्क खासगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला ...

Washing of private vehicles with Corporation's toilet water | मनपाच्या स्वच्छतागृहाच्या पाण्याने खासगी वाहनांची धुलाई

मनपाच्या स्वच्छतागृहाच्या पाण्याने खासगी वाहनांची धुलाई

Next

मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून चक्क खासगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. भाईंदर पश्चिमेस नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाला लागून महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. त्याची देखभाल-स्वच्छतेसाठीची जबाबदारी महापालिकेच्याच देखरेखीखाली होते. परंतु, देखभालीसाठी ठेवलेल्या लोकांकडून मात्र महापालिकेच्या पाण्याची चक्क बेकायदा विक्री खासगी वाहनांच्या साफसफाईसाठी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

येथील कर्मचारी पालिकेच्या पाण्याची विक्री खासगी वाहनचालकांना त्यांच्या वाहनांच्या धुलाईसाठी नियमितपणे करीत आहेत. त्यामुळे शौचालयाच्या समोरच्या भागात गाड्यांचे बेकायदेशीर वॉशिंग सेंटरच जणू सुरू झाले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे मोठ्या बस, रिक्षा, मोटारकार, आदी सर्रास शौचालयातील पाणी घेऊन धुतल्या जातात. रस्त्यावरच धुलाईचे काम केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा होतोच, शिवाय रस्त्यावर पाणी साचते.

महापालिकेच्या पाण्याची बेकायदेशीर विक्री करून खासगी वाहनांची धुलाई पैसे घेऊन केली जात असल्याची तक्रार युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बामणे यांनी महेश चव्हाण, शुभम ढोके, प्रशांत मोरे, आदी पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन महापालिका आयुक्त डाॅ. विजय राठोड, आरोग्य विभागाचे उपायुक्त डाॅ. संभाजी पानपट्टे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित, आदींना केली आहे. दोषी कर्मचारी आणि त्यांच्या ठेकेदारावर कारवाई करावी. ठेका रद्द करून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Washing of private vehicles with Corporation's toilet water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.