भाजपाकडून तरुणाची धुलाई

By admin | Published: October 9, 2016 04:07 AM2016-10-09T04:07:10+5:302016-10-09T04:07:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल कलाम

Washing the youth from BJP | भाजपाकडून तरुणाची धुलाई

भाजपाकडून तरुणाची धुलाई

Next

मीरा रोड : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपत्तीजनक छायाचित्रे फेसबुकवर टाकणाऱ्या मोबिनच्या शोधार्थ गणेश देवलनगरमध्ये आलेल्या भाजपा, विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल कलाम याला विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार कलाम याने केली आहे. पोलिसांनी अद्याप मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
भार्इंदर पश्चिमेकडील गणेश देवलनगरमध्ये रामाग्या यादव यांची खोली असून त्यांनी ती गेल्या दोन वर्षांपासून मोबिन अहमद यास भाड्याने दिली आहे. स्टील कारखान्यात काम करणारा मोबिन हा आपल्या अन्य तिघा सहकाऱ्यांसह राहतो. मोबिन याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विडंबनात्मक छायाचित्रे टाकल्याने भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोबिनला मारण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून तो राहत असलेल्या घरात शिरले. त्यावेळी मोबिन त्यांना सापडला नाही. मात्र, मोबिनसोबत राहणारा अब्दुल कलाम याला त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या धटिंगणशाहीची दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी कलाम याला पोलीस ठाण्यात आणून चौकशीसाठी बसवून ठेवले. घराचा मालक रामाग्या यादव यालाही चौकशीला आणले. मूळ मारहाणीेची चौकशी करायचे सोडून यादवने खोली भाड्याने देताना पोलीसांचे नाहरकत प्रमाणपत्र न घेतल्याने कलाम व यादव यांनाच फैलावर घेतले.
बजरंग दलाचे गौरांग कंसारा, भाजपा युवा मोर्चाचा विनोद शिंदे, विहिपचे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जमून कलाम व यादव यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. (प्रतिनिधी)

आपण काही केलेले नाही. फेसबुकवर कुणी काय पोस्ट टाकली, तेही आपल्याला माहीत नाही. अचानक रात्री गुंड घरात शिरले व मारहाण करू लागले. पोलिसांनी मला मारहाण झाल्याची ना तक्रार घेतली, ना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली.
- अब्दुल कलाम

आम्ही कुणालाही मारहाण केलेली नाही. अन्य कुणी लोकांनी मारहाण केली असेल. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता खोली भाड्याने देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
-विनोद शिंदे,
सचिव, भाजपा युवा मोर्चा

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मोबिनचा आम्ही शोध घेत आहोत. याबाबत, तक्रार आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तक्रारी व घडलेला प्रकार सरकारी वकिलांकडे कायदेशीर सल्ल्याकरिता पाठवला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
-अनिल कदम,
वरिष्ठ निरीक्षक, भार्इंदर पोलीस ठाणे

Web Title: Washing the youth from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.