स्वखर्चातून कचराप्रक्रिया प्रकल्प; वास्तुविशारदाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:42 AM2019-06-05T00:42:39+5:302019-06-05T00:42:50+5:30

पर्यावरण दिन विशेष : दोन यंत्रे आजपासून होणार सुरू

Waste pitch project; Architectural activities | स्वखर्चातून कचराप्रक्रिया प्रकल्प; वास्तुविशारदाचा उपक्रम

स्वखर्चातून कचराप्रक्रिया प्रकल्प; वास्तुविशारदाचा उपक्रम

Next

मुरलीधर भवार 

कल्याण : पर्यावरणाचा समतोल राखणारी घरे निर्माण करणाऱ्या वास्तुविशारदाने इको-फ्रेण्डली अर्थात ग्रीन सोसायटी तयार केली आहे. त्यांनी या सोसायटीत स्वखर्चातून वापरलेला नारळ, प्लास्टीक, काचा यांसारख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पर्यावरणदिनी दोन संयंत्रे सुरू करण्यात येणार असून नारळाच्या कचºयापासून भुसा, काचेवर प्रक्रिया करून रांगोळी, भाजीपाला व तत्सम कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि प्लास्टीकवरील प्रकिया करून ते रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या मानपाडा येथून संदप गावाकडे जाणाºया रस्त्यालगत पॅरामाउंट पार्क ही ग्रीन सोसायटी आहे.

सोसायटीच्या आवारात झाडे असून जमिनीत पाणी मुरावे यासाठी पेव्हरब्लॉक लावण्यात आलेले नाहीत. तसेच, गॅलेरीमध्ये बाग असून वर्षा जलसंचयन प्रकल्प राबवण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पही सोसायटीच्या मालकाचा आहे. वास्तुविशारद दिलीप देशमुख यांनी ग्रीन सोसायटीची संकल्पना राबवली आहे. पर्यावरणपूरक घरे या विषयात त्यांनी वास्तुविशारदाचे शिक्षण घेतले आहे. इगतपुरीनजीक एका आदिवासी गावात एक हजारापेक्षा जास्त झाडे त्यांनी लावली आहेत. तसेच, प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांनी बॅटरीवर चालणाºया दोन गाड्या घेतल्या आहेत. आता त्यांनी कचºयाच्या विल्हेवाटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा त्यांचा छंद ते स्वखर्चातून जोपासत आहेत.

शहरातील नारळपाणी, भाजीपाला विक्रेत्यांकडील कचरा, फेकलेल्या काचेच्या बाटल्या यावर प्रक्रिया करणारे यंत्र त्यांनी खरेदी केले आहे. त्यासाठी महिनाभरापासून त्यांनी विघटनशील आणि पुनर्प्रक्रियायोग्य कचरा गोळा केला आहे. त्यासाठी दोन यंत्रे कार्यान्वित करणार असून त्यासाठी स्वत:च्या खिशातून दहा लाख खर्च करणार आहेत. नारळाच्या कचºयापासून भुसा बनवून त्याचा सरपण म्हणून वापर करता येणार आहे. काचेपासून रांगोळी, तर प्लास्टीकवर प्रक्रिया करून त्याचा रस्तेकामात उपयोग करता येणार आहे. भाजीपाला व ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सोसायटीच्या एक पिकअप व्हॅनला दुपारी १ ते रात्री दहा वाजता वाहतूक कमी असताना कचरा गोळा करण्याची परवानगी महापालिकेने द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे देशमुख यांनी केली आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया केंद्राचे यंत्र उद्या पर्यावरण दिनानिमित्त कार्यान्वित केले जाणार आहे.

काय होणार फायदे

  • कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्याचे प्रमाण कमी होईल.
  • कचऱ्याचा डोंगर वाढणार नाही.
  • डम्पिंगच्या दुर्गंधीपासून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून सुटका होईल.
  • मिथेन वायू निर्मिती थांबून पर्यावरण संरक्षण होईल.
  • कचरा वाहतूक गाड्यांची संख्या कमी झाल्यास वाहतूककोंडी होणार नाही.
  • कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी होईल.
  • पर्यावरणाचे संतुलन राहण्यास मदत होईल.

Web Title: Waste pitch project; Architectural activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.