निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:22 AM2019-04-12T01:22:10+5:302019-04-12T01:22:38+5:30

उमेदवारांना बँक खाते उघडण्याची केली सक्ती : २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम काढणाऱ्याची चौकशी

watch on financial transactions in the elections | निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

Next

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या काळात होणाºया आर्थिक उलाढालीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध आणले आहेत. आचारसंहिता काळात मोठी आर्थिक उलाढाल होणाºया आणि संशयास्पद बँक खात्यांवर निवडणूक आयोगासह आयकर विभागानेही आपले लक्ष केंद्रित केले आहे. तर, आॅनलाइन बँकिंगच्या माध्यमातून होणाºया आर्थिक हेराफेरीवर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आपली करडी नजर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.


निवडणूक काळात राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून होणारी मोठ्या प्रमाणात उलाढाल यावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. एका उमेदवाराला प्रचार आणि इतर कारणांसाठी ७५ लाखांची मर्यादा दिलेली आहे. या मर्यादेचे पालन होते का? की वारेमाप खर्च होतोय? आणखीही कोणत्या ठिकाणी पैसे खर्च केले जात आहेत का? याचे निरीक्षण खर्च निरीक्षकांकडून केले जात आहे. निवडणूक खर्चाच्या व्यवहारासाठी उमेदवाराला बँकेमध्ये खाते उघडणे बंधनकारक केले आहे. याच खात्यामार्फत केलेल्या व्यवहाराचा तपशील खर्च नियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मोठी उलाढाल करणारे नेते, उमेदवारांच्या तसेच संशयास्पद बँक खात्यावर आयकर विभागासह पोलिसांनीही लक्ष केंद्रित केले आहे. आॅनलाइन आर्थिक हेराफेरीवरही पोलिसांच्या सायबर सेल विभागाची करडी नजर आहे.


लाखोंच्या उलाढालीवर विशेष नजर
दोन महिन्यांत एखाद्या बँक खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नसताना अचानकपणे त्या खात्यावर एखाद्यामार्फत पैसे जमा झाले किंवा एका खात्यातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले. तसेच २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यात आली किंवा जमा करणाºया संशयास्पद खात्यांवरही पोलिसांसह निवडणूक आयोगाचीही नजर राहणार आहे. एखादी एजन्सी बँकेसाठी आउटसोर्सिंग करत असेल, तर त्या एजन्सीकडे ओळखपत्र तसेच संबंधित बँकेचे ओळखपत्र आहे की नाही, याबाबतदेखील पोलीस पडताळणी मोहीम राबवणार आहेत. तर, संशयास्पद व्यवहार, बनावट नोटा आदी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.


याठिकाणी पकडली रोकड
जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडीमधून पहिल्या दिवशी साडेचार लाख रुपये आणि दुसºया दिवशी दोन लाख १४ हजार आणि १० लाखांची रक्कम वाहनातून पकडण्यात आली. या रोकडजप्तीच्या तीन घटना भिवंडीमध्ये घडल्या आहेत. तर, ठाणे मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघामधील उरणफाटा ब्रिज येथे वाहनातून नेण्यात येणारी १० लाखांची रक्कम पकडण्यात आली आहे. खर्च निरीक्षकाच्या पथकांकडून या रकमा पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: watch on financial transactions in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.