घंटागाड्यांच्या कामचुकारीवर जीपीएसचा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:05 AM2018-06-20T03:05:09+5:302018-06-20T03:05:09+5:30

प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलला जातो अथवा नाही, घंटागाड्या वेळेत पोहचतात किंवा नाही, त्यांच्याकडून कामचुकारपणा होता का? यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारीपासून १६० घंटागाड्या जीपीएस प्रणालीला जोडल्या आहेत.

Watch the GPS at the Ghuggar's Kamchukis! | घंटागाड्यांच्या कामचुकारीवर जीपीएसचा वॉच!

घंटागाड्यांच्या कामचुकारीवर जीपीएसचा वॉच!

Next

ठाणे : प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलला जातो अथवा नाही, घंटागाड्या वेळेत पोहचतात किंवा नाही, त्यांच्याकडून कामचुकारपणा होता का? यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारीपासून १६० घंटागाड्या जीपीएस प्रणालीला जोडल्या आहेत. त्याचा चांगलाच फायदा झाला असून कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करून आतापर्यंत १५ लाखांचा दंड वसूल केला आहे. यामुळे घंटागाड्यांना शिस्त लागल्याचा दावा पालिकेने केला आहे.
ठाणे महापालिकेच्या घंटागाड्यांवर सुरुवीताला कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. जो भाग ज्या घंटागाडीसाठी देण्यात आला त्या भागात ती जाते किंवा नाही, याबाबतदेखील कोणतीच माहिती पालिकेला उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे अनेक भागातील कचरा न उचलणे, तो पडून राहणे अशा अनेक समस्यांना पालिकेला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळेच या समस्येवर मात करून घंटागाड्यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने जीपीएस प्रणालीचा आधार घेतला. त्यानुसार ही प्रणाली जानेवारी महिन्यात सुरू झाली आहे. यानुसार प्रत्येक घंटागाडीवर एक चीप बसवली आहे. तिच्या माध्यमातून दिवसभरात संबधित घंटागाडी कुठे, कोणत्या भागात, किती किमी फिरली, याची माहिती अधिकाºयांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या घंटागाडयÞांवर व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅण्ड मॉनेटेरिंग ही यंत्रणा बसवली आहे. त्यानुसार आता पालिका आणि कंत्रटदाराच्या मिळून एकूण १६० वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यासाठी प्रतिमाह १ लाख ४४ हजार खर्च अपेक्षित असून तीन वर्षाच्या देखभाल दुरु स्तीसाठी ५२ लाख १६ हजार रु पयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
>ही प्रणाली यशस्वी झाल्याचा दावा पालिकेने केला असून कामचुकार करणारे ठेकेदार आणि घंटागाडी कर्मचाºयांवरदेखील यामुळे अंकुश बसला आहे. जानेवारी ते आतापर्यंत पालिकेच्या घनकचरा विभागाने रोजच्या फेरीचे एका घंटागाडीचे ३ हजार रुपये आणि त्यावरील तेवढ्याच स्वरुपाचा किंवा त्याहून अधिकचा दंड वसूल केला आहे. त्यानुसार या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत १५ लाखांचा दंड वसूल झाला असून यामुळे घंटागाडी कर्मचारी आणि ठेकेदारांनादेखील शिस्त लागली आहे.

Web Title: Watch the GPS at the Ghuggar's Kamchukis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.