‘त्या’ १४ गावांचा पाणीप्रश्न पेटला, राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:42 AM2018-12-18T05:42:32+5:302018-12-18T05:42:50+5:30

राष्ट्रवादीचे आंदोलन : जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला; प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा निषेध

The 'water' of the 14 villages burnt the question, NCP's agitation | ‘त्या’ १४ गावांचा पाणीप्रश्न पेटला, राष्ट्रवादीचे आंदोलन

‘त्या’ १४ गावांचा पाणीप्रश्न पेटला, राष्ट्रवादीचे आंदोलन

Next

डोंबिवली : कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट असून त्याकडे प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी शीळफाट्याजवळील दहिसर गावात आंदोलन करत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला.

कल्याण तालुक्याच्या सीमेवर असलेली १४ गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. या गावांत साधे पिण्याचे पाणीही पोहोचू शकलेले नाही. सत्ताधारी भाजपा-शिवसेना आणि प्रशासनाचे हे सपशेल अपयश आहे. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग रोखल्याचे पक्षाचे नेते वंडार पाटील यांनी सांगितले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, बाबाजी पाटील, आदी उपस्थित होते.
 

Web Title: The 'water' of the 14 villages burnt the question, NCP's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.