डोंबिवली पश्चिमेतील चाळींत शिरले खाडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:33+5:302021-07-23T04:24:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पश्चिमेतील खाडीलगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली. देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, ...

The water of the creek seeped into the chalis west of Dombivli | डोंबिवली पश्चिमेतील चाळींत शिरले खाडीचे पाणी

डोंबिवली पश्चिमेतील चाळींत शिरले खाडीचे पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : पश्चिमेतील खाडीलगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली. देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, मोठागाव, अनमोलनगरी आदी परिसर पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. शेकडो कुटुंबीयांना दोरखंडाद्वारे बाहेर काढून नंतर बोटीने सुखरूप ठिकाणी हलविण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी शहारांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते.

कल्याण खाडीला सतत येणाऱ्या मोठ्या भरतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गुरुवारी भरती असल्याने सुमारे ४.७ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे ते पाणी खाडीमार्गे शहरात शिरले. पश्चिमेतील कुंभारखाण पाडा, अनमोल नगरी, देवीचा पाडा येथील चाळी तसेच काही गृहसंकुलांचा तळ मजला पाण्याखाली होता. बराच वेळ ते पाणी थांबून राहिल्याने नागरिकांची चिंता वाढली. पाणी साचत असल्याने बारवी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याच्या अफवांचे पीकही आले होते. परंतु, मनपाने त्याचे खंडन केले.

दरम्यान, पौर्णिमा शुक्रवारी लागणार असून, आणखी पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांना महापालिकेच्या २० नंबर शाळेत, इमारतींच्या हॉलमध्ये तसेच काही रिकाम्या इमारतीत निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.

---------------------

Web Title: The water of the creek seeped into the chalis west of Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.