ठाण्याला भेडसावतेय पाणीबाणीचे संकट

By admin | Published: July 8, 2015 10:23 PM2015-07-08T22:23:30+5:302015-07-08T22:23:30+5:30

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस

Water crisis crisis in Thane | ठाण्याला भेडसावतेय पाणीबाणीचे संकट

ठाण्याला भेडसावतेय पाणीबाणीचे संकट

Next

ठाणे : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शहरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरण क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा आटू लागला आहे. त्यामुळेच महापालिकेने ठाणेकरांना जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे.
एमआयडीसी आणि स्टेमचा पाणीसाठा हा १३ टक्क्यांवर आला असून शहराला जेमतेम २० ते २५ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्राधिकरणाकडून शहरात अनेक ठिकाणी पाणीकपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे आहेत. तर पालिकेच्या स्वत:च्या योजनेत दोन महिन्यांचा साठा शिल्लक असल्याने शहरातील काही भागांवर फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाण्याला आज विविध स्रोतांच्या माध्यमातून ४७२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचे हे प्रमाण २२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

४शहरात आजघडीला ४५ टक्के पाणीगळती असल्याचे पालिकेने मान्य केले असून पाणीनियोजन आणि वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने ठाणेकरांना आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यातच, डिसेंबरपासून महापालिका हद्दीत १४ टक्के पाणीकपात लागू झाली आहे.
४एक आठवडा ठाणे शहर आणि दुसरा आठवडा कळवा, मुंब्रा, दिवा अशा पद्धतीने १४ टक्के कपात केली जात आहे. परंतु, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे पालिकेमार्फत केली जाणारी पाणीकपात दोन आठवडे केली नव्हती.

४आता पावसाने दडी मारल्याने ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. शहरातील काही भाग वगळल्यास उर्वरित भागांना ती अधिक जाणवणार आहे. यात स्टेम, एमआयडीसीकडून कळवा, मुंब्रा, विटावा, दिवा, बाळकुमचा काही भाग, पडलेगाव, गणपतीपाडा, आतकोनेश्वरनगर, वाघोबानगर आदी भागांना फटका बसणार आहे.

Web Title: Water crisis crisis in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.