पाणीसंकट आणखी भीषण
By admin | Published: March 9, 2016 01:58 AM2016-03-09T01:58:39+5:302016-03-09T01:58:39+5:30
पाण्याची स्थिती बिकट बनल्याने आहे तेच पाणी पुरवून वापरण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात मंगळवारी रात्री १२ पासून आणखी २५ टक्के कपात लागू केली
मुरलीधर भवार, कल्याण
पाण्याची स्थिती बिकट बनल्याने आहे तेच पाणी पुरवून वापरण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात मंगळवारी रात्री १२ पासून आणखी २५ टक्के कपात लागू केली. आधीच एमआयडीसीची ३५ टक्के कपात अंमलात होती. त्यात ही भर पÞडल्याने ६० टक्के कपात लागू झाली आहे. परिणामी, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा-भाईंदर, ठाण्यातील मुंब्रा-कळव्याचा भाग, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत असलेली २७ गावे यांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे. याचा फटका उद्योगांना पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यालाही बसणार आहे.
लूघ पाटबंधारे खात्याने एमआयडीसीच्या पाणी पुरवठयावर यापूर्वीच ३५ टक्के कपात लागू केली होती. अडीच दिवस पाणीपुरवठा बंद आणि उरलेल्या साडेचार दिवसांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. त्यात आणखी २५ टक्कयांची भर पडल्याने अडीच दिवस पाणीबंद कायम राहील. साडेचार दिवसात ग्राहकांना ४० टक्केच म्हणजे दिवसातील आठ तास पाणी मिळेल, अशी माहिती एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांनी दिली.