भिवंडीत १९ जानेवारी रोजी पाणी कपात; कार्यकारी अभियंत्यांनी दिली माहिती

By नितीन पंडित | Published: January 17, 2024 06:22 PM2024-01-17T18:22:06+5:302024-01-17T18:23:04+5:30

अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी बुधवारी दिली आहे.

Water cut in Bhiwandi on January 19; Information provided by Executive Engineer | भिवंडीत १९ जानेवारी रोजी पाणी कपात; कार्यकारी अभियंत्यांनी दिली माहिती

भिवंडीत १९ जानेवारी रोजी पाणी कपात; कार्यकारी अभियंत्यांनी दिली माहिती

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्री अँड इन्फ्रा कंपनी प्रा.लि. ठाणे यांचेकडून दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता शुक्रवार १९ जानेवारी सकाळी ९ ते शनिवार २० जानेवारी सकाळी ९ या २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने भिवंडी शहरांसाठी स्टेम मार्फत होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे व त्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी बुधवारी दिली आहे.

या पाणी बंद राहण्याने शहरातील ममता टाकी,चाविंद्रा गांव,पटेलनगर, बाला कंपाऊन्ड, फरीदबाग,बारक्या कंपाऊन्ड,संगमपाडा,कचेरी पाडा,ब्राम्हणआळी,कसारआळी,भावेनगर, कोंबडपाडा,आदर्शपार्क,अजयनगर,नझराना कंपा.गोकुळनगर,इंदिरानगर,कल्याणरोड, ठाणगेआळी,तीनबत्ती, शिवाजीनगर स्टाफ क्वॉटर्स,खडकरोड, गुरुचरणपाडा,अजमेर नगर, पटेल कंपा.,शमानगर,साईनाथ सोसायटी, अंजूरफाटा,देवजीनगर,नारपोली,विठ्ठलनगर, सोनीबाई कंपा.,खलीक कंपा, फैजान कंपा., मेहता कंपाउन्ड,रोशनबाग, देऊनगर टावरे कंपाउन्ड,भंडारी कंपा,नारपोली गांव,देवजीनगर, आय.जी.एम. पाण्याची टाकी,निजामपूरा, इस्लामपुरा,आमपाडा,अवचितपाडा,म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर,नेहरूनगर,मिल्लतनगर १,२,३,नविवस्ती,कोंडाजीवाडी,चव्हाण कॉलनी, वेताळपाडा,बाळा कंपा, खंडूपाडा,अंसार मोहल्ला,डोलारे पेट्रोलपंप,खोका कंपाउन्ड, कामतघर,अंजूरफाटा,जूनी ताडाळी,नवी ताडाळी, भाग्यनगर,हनूमान नगर,जयअंबे सोसायटी,कमला हॉटेल परीसर,श्रीरंगसोसायटी, गणेश सिनेमा,नवजीवन कॉलनी,समदनगर, कणेरी,न्यु कणेरी, गौरीपाडा,पद्मानगर,अशोक नगर,घुंघटनगर,कोटरगेट,बरफ गल्ली, काप आळी,इस्लामपूरा,उर्दरोड, कुरेशनगर,लाहोटी कंपाउन्ड,भादवड, टेमघर या भागात पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

Web Title: Water cut in Bhiwandi on January 19; Information provided by Executive Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.