पाचशे फूट दरीतून दापुऱ्यात आले पाणी; जलपरीची कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:51 AM2019-06-04T00:51:06+5:302019-06-04T00:51:18+5:30

पालकमंत्र्यांची भेट, मराठी तरुणाने सोलर वॉटरपंपाद्वारे साधली किमया

Water from Drapau, five hundred feet wide; The Great Dress Up | पाचशे फूट दरीतून दापुऱ्यात आले पाणी; जलपरीची कमाल

पाचशे फूट दरीतून दापुऱ्यात आले पाणी; जलपरीची कमाल

Next

श्याम धुमाळ 

कसारा : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पंधरवड्यात शहापूर तालुक्यातील दापूर या अतिदुर्गम अशा आदिवासीवाडीला भेट दिली होती. आदिवासी ग्रामस्थांच्या पाणी, वीज आणि रस्त्यांबाबतच्या समस्या समजल्यानंतर त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर, प्रशासन कामाला लागले आणि गुरु वारी सायंकाळी गावात तब्बल ५०० फूट खोल दरीतून जलपरीद्वारे पाणी गावात आले. त्यावेळी येथील आदिवासींच्या चेहºयावर हास्य पसरले होते.

शहापूर तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दरवर्षी लागणाºया टँकरपेक्षा यंदा जास्त टँकरची गरज भेडसावत आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांमधील ग्रामस्थांना तानसा, भातसा, वैतरणा नद्यांतील पाणी डोळ्यांनी दिसते; पण ते खोल दरीत असल्याने हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना तब्बल दोन तासांची पायपीट करून दरीत उतरावे लागते.

दरम्यान, अरुण शिंदे या मराठी तरु णाने विदर्भातील नागपूर, भंडारा, नंदुरबार जिल्ह्यांत पाणीटंचाईविरोधात राबवलेल्या मोहिमेत सोलर वॉटरपंपाच्या माध्यमातून १०० ठिकाणी जलपरी योजना राबवून ग्रामस्थांना पाणी मिळवून दिले आहे. त्याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या दापूर या गावात प्रायोगिक तत्त्वावर या जलपरीचे काम शिंदे यांनी सुरू केले होते. नाशिक जिल्ह्यातील ब्ल्यू चिप पॉवर एनर्जी कंपनीत जर्मनी, तैवान या देशांतून सोलरसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री मागवली जाते. सोलरपंप, डीसीपंप, पवनचक्कीच्या माध्यमातून जलपरी बनवली जाते. दापूर गावाच्या मागील बाजूस असलेल्या वैतरणा नदीपात्रातून तब्बल ५०० फूट दरीतून या जलपरीद्वारे पाणी गावात आणले. याच पद्धतीने तालुक्यातील इतर डोंगराळ भागात पाण्यासाठी जलपरी योजना राबवण्याचा प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराधीन असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते.

आठ दिवसांत सौरदिव्यांनी दापूरसह सावरखेड लखलखणार
दापूरमाळ, सावरखेड या गावांची पाणीसमस्या सोडवण्यात यश आले असून या गावांमध्ये आता लवकरच सौरऊर्जेवर चालणाºया दिव्यांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. याशिवाय, टंचाईग्रस्त गावपाड्यांत पाच हजार लीटरच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले असून, सुमारे शंभरहून अधिक टाक्या वाटण्यात आल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी आमच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढला. आमची पाण्याची समस्या त्यांच्या प्रयत्नांमुळे सुटल्यात जमा आहे.- विजय शिंगवा, ग्रामस्थ

प्रायोगिक तत्त्वावर जलपरीची योजना दापूर येथे राबवली आहे. ५०० फूट खोल दरीतून पाणी आणण्यात यश मिळाले आहे. आता गावात पाच हजार लीटरची टाकी बसवून, संपूर्ण गावात नळपाणीयोजना राबवणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च सहा ते सात लाख रुपये असून, तो स्वत: मी केला आहे. - अरुण शिंदे, जलपरी पाणीयोजना

Web Title: Water from Drapau, five hundred feet wide; The Great Dress Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी