टिटवाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:16 AM2019-12-25T00:16:17+5:302019-12-25T00:16:41+5:30

लाखो लीटर वाया : पालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईची भीती, नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

Water leakage in several places in Titwali | टिटवाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळती

टिटवाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळती

Next

टिटवाळा : यंदा अतिवृष्टीमुळे राज्यभरातील सर्वच धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. टिटवाळ्याजवळच्या काळू नदीवर केटी बंधारा असून येथून मोहिली उदंचन केंद्रामार्फत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. मांडा-टिटवाळ्यात मात्र अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. ही गळती न रोखल्यास शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

टिटवाळा पूर्वेकडील सुमुख सोसायटी, दळवी वाडा, हरिओम व्हॅली, गणेशनगर सोसायटी, निमकरनाका, मातादी मंदिर टेकडी परिसर, गणपती मंदिर परिसर, महागणपती हॉस्पिटलजवळ, जावईपाडा, नांदप रोड, इंदिरानगर, तर पश्चिमेतील वासुंद्री रोडवर असलेल्या दर्यायी महाल, पंचवटी चौक, तुलसी व्हीला सोसायटी परिसर आदी ठिकाणी जागोजागी मुख्य जलवाहिन्या फुटल्याने रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद कानेटकर यांनी इशारा दिला आहे.
महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली येथील १०० एमएलडी या उदंचन केंद्रातून आणि टिटवाळा येथील पाणीपुरवठा योजनेतून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहिली, उभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी आणि आंबिवली या परिसरांत पाणी शुद्धीकरण करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पालिका प्रशासनाकडून केला जातो. टिटवाळा येथे काळू नदीवर पाच दशलक्ष क्षमतेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना २००५ मध्ये सुरू करण्यात आली आहे. टिटवाळा-गुरवलीजवळ कोल्हापूर धर्तीच्या बंधाºयाच्या पाणीसाठ्यावर ही पाणीयोजना सुरू करण्यात आली. या पंपहाउसमधून टिटवाळा गाव, म्हस्कळ रोड, गोवेली रोड परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या परिसरासाठी २५ व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठ होत असून त्यातून गळती होत आहे. गेल्या वर्षी काळू नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने टिटवाळा पाणीयोजनेतून पाणीपुरवठा बंद करून मोहिली उदंचन केंद्रातून सुरू करण्यात आला. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईची समस्या निर्माण झाली होती. अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी पालिका प्रशासनाने होणारी पाणीगळती दुरु स्त करावी, अशी मागणी होत आहे.

जलवाहिन्यांतून ठिकठिकाणी होत असलेली गळती तातडीने थांबवण्यात येईल. तसे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.
- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा, ‘अ’ प्रभाग क्षेत्र

मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. बेकायदा जोडण्यांमुळे हा प्रकार सुरू असून पालिका प्रशासनाच्या कर्मचाºयांकडून त्याला पाठीशी घातले जात आहे.
- अशोक डोंगरे, रहिवासी, टिटवाळा
 

Web Title: Water leakage in several places in Titwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.