VIDEO: नागरिकांच्या घरात पाणी घुसले; दिव्यातील नालेसफाईचा पहिल्याच पावसात 'पंचनामा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 12:14 PM2021-06-09T12:14:45+5:302021-06-09T12:19:18+5:30
पहिल्याच पावसात हे हाल, चार महिने कसे काढायचे..? स्थानिकांचा सवाल
Next
दिवा: गटारांचे योग्य नियोजन नसल्याने व नालेसफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात दिव्यातील अनेक घरांत पाणी साचन्यास सुरुवात जाली आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे. अशा स्थितीत कोणत्याही दुर्घटना घडू नयेत यासाठी पालिकेने येथील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था करावी, त्याच बरोबर नालेसफाईची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
दिवा- पहिल्याच पावसात पाणी घरांमध्ये शिरल्यानं नागरिक त्रस्त; नालेसफाईच्या कामांचा पहिल्याच पावसात पंचनामा https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/9kyiMMqw3v
— Lokmat (@MiLOKMAT) June 9, 2021
दिव्यात नालेसफाईच्या नावाने नेहमीच हात सफाई होत असल्याचा आरोप होत असतो. यावेळी पालिकेने दिव्यात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे केली आहेत. मात्र पाणी जाण्यासाठी गटारे नीट केली नसल्याने, त्याचबरोबर मुख्य नाल्यांची सफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात बैठ्या चाळीत गटारांचे व नाल्याचे पाणी घुसण्याचे प्रकार दिव्यात घडले आहेत. पावसाचे पाणी गटारांचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून नालेसफाई न करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.