अधिकाऱ्यांच्या तोंडचे पळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:33 AM2018-05-15T03:33:53+5:302018-05-15T03:33:53+5:30

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे.

Water run away from the mouth of the officials | अधिकाऱ्यांच्या तोंडचे पळाले पाणी

अधिकाऱ्यांच्या तोंडचे पळाले पाणी

Next

अनगाव : भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी बुधवारी भिवंडी पंचायत समितीत स्वतंत्र बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामविकास अधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन पाणीटंचाई दूर करण्याच्या उपायांवर लक्ष देणार माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाय न योजल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिल्याने या बैठकीत नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाणीटंचाईच्या मुद्द्यावर सध्या सतत आंदोलने सुरू आहेत.
या पाणीटंचाईचे भीषण चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आणि बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे यांनी गटविकास अधिकाºयांची भेट घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला. २५ एप्रिलच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रवीकांत पाटील, माजी उपसभापती प्रकाश भोईर यांनी पाणीपुरवठा उपअभियंत्यांना धारेवर धरत टंचाई दूर करण्यासाठी सूचना केल्या. श्रमजीवी संघटनेने २७ एप्रिलला भिवंडी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाण्यासाठी आक्रोश केला.
पाणीटंचाईचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरल्याने आणि संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरल्याने मंगळवारी तत्काळ ग्रामविकास अधिकाºयांची बैठक बोलावली आहे. अकरा ठिकाणी बोअरवेल खोदल्या आहेत. सहा ठिकाणी नादुरूस्त बोअरवेल दुरूस्त करून टाक्या बसवून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन यंत्रांद्वारे टंचाईग्रस्त गावपाड्यात बोअरवेल खोदण्याचे काम सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी श्रमजीवीचे संघटनेचे जनरल सक्रेटरी बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सचिव संगिता भोमटे, आशा भोईर, मोतीराम नामकुडा, केशव पारधी, गौतम पाटील, प्रकाश राऊत, सागर देसक या संघटनेच्या पदाधिकाºयांना दिली. उर्वरित गावपाड्यांची पाणीटंचाई लवकर दूर न केल्यास जिल्हा परिषद अध्यक्षांनाच घेराव घालण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली आहे.
सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना भिवंडी पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता एन. जी. राऊत पंचायत समितीत गैरहजर रहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली आहे.
>शहापूरमधील टँकरचे पाणी
२१ तारखेपासून होणार बंद
भातसानगर : गेल्यावर्षी पाणी पुरवण्यासाठी वापरलेल्या टँकरची बिले अद्यापही न मिळाल्याने शहापूर तालुक्यात सध्या टँकरने होत असलेला पाणीपुरवठा २१ तारखेपासून बंद करण्याचा इशारा टँकरमालक विजय शिंदे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात गेल्यावर्षी १९ टँकरने टंचाईग्रस्त गावापाड्यांना पाणीपुरवठा केला होता मात्रे त्या बिलाचे ५५ लाख रु पये अजूनही या ठेकेदारांना न मिळाल्याने त्यांनी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा गटविकास अधिकारी व्ही. घोरपडे यांना दिला. सध्या २८ गावे, ८८ पाड्यांना टंचाई भेडसावते आहे.
>पाणीपुरवठा मालकांची मानसिकता मी समजू शकतो. त्यांचे गेल्यावर्षीचे पैसे लवकरात लवकर मिळावे म्हणून मी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. पुन्हा तसे पत्र तयार करीत आहे.
- व्ही. घोरपडे, गटविकास अधिकारी शहापूर

Web Title: Water run away from the mouth of the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.