जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाई, साडेबारा कोटींच्या आराखड्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:53 AM2020-01-08T01:53:53+5:302020-01-08T01:53:57+5:30
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
सुरेश लोखंडे
ठाणे : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात जीवघेणी पाणीटंचाई उद्भवणार नसल्याचा होरा होता. मात्र, यंदा ही टंचाई काही महिने उशिराने उद्भवणार असून ८४६ गावपाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार यंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने १२ कोटी ६५ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. या खर्चातून फेबु्रवारी अखेरपर्यंत उद्भवणाऱ्या टंचाईवर मात करण्यात येणार आहे.
भूजल सर्वेक्षणानुसार यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील संभाव्य पाणीटंचाईचा अहवाल तयार केला आहे. या पाणीटंचाईवर वेळीच मात करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी विविध कामांसाठी १२ कोटी ६५ लाख रूपये खर्चाचा आराखडा तयार केला. या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारे टंचाईवरील उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये तीव्र टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रमुख उपाययोजनेसह नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी म्हणजे हातपंपांची दुरुस्ती, नवीन बोअरिंग करून हातपंप बसवणे आदी कामे २४६ गावांसह ६०० आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांवर करण्याचे नियोजन आहे. यासाठी १२.६५ कोटींच्या आराखड्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली आहे.
>हातपंपांसाठी ३६ लाखांची तरतूद
हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३६ लाखांची तरतूद आहे. यातून ३५ गावे ८७ पा्यांमधी हातपंप दुुरुस्तीचे नियोजन आहे. एक कोटी ४४ लाख रूपये खर्चातून ५५ गावे आणि १८५ पाड्यांमध्ये बोअरिंग व त्यावर हातपंप बसवण्याचे नियोजन आहे. यासाठी १९ गावे ३२ पाडे शहापूर तालुक्यातील आहेत. त्यावर सर्वाधिक ३२ लाखांच्या खर्चाचे नियोजन आहे. मुरबाडच्या १६ गावे आणि १७ पा्यात यावर्षी बोअरिंग लावण्यासह हातपंपही बसवले जातील. त्यासाठी १९ लाखाच्या खर्चाचे नियोजन केले. भिवंडीतील १३ गावे ८७ पाड्यांमध्ये बोअरिंग व हातपंप घेतले जाणार असून त्यावर ६० लाखांच्या खर्चाचा आराखडा तयार झाला आहे. कल्याणचे चार गावे २५ पाडे या बोअरिंग व हात पंपास पात्र आहेत. त्यासाठी 17
लाखांचे नियोजन आहे. अंबरनाथचे तीन गावे २४ पा्यांमध्येही हातपंप, बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे.
>विहिरींचे खोलीकरण नाही
यंदा विहिरींच्या खोलीकरणासह तीमधील गाळ काढण्याचे कामही करण्यात येणार नाही. तर बुडक्याही घेण्याची गरज नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. तीव्र पाणीटंचाई १२२ गावे आणि ३०६ पाड्यांमध्ये उद्भवू शकते. यासाठी दोन कोटी ३३ लाख रूपये खर्चाचे नियोजन आहे. टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाºया ८७ नळपाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.
शहापूर तालुक्यात सर्वाधिक गावे
जिल्ह्यात सर्वाधिक शहापूर तालुक्यांमधील ७७ गावे आणि २३३ आदिवासी पा्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी शहापूर तालुक्यास एक कोटी ७१ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन आहे. या खालोखाल मुरबाडच्या ३५ गावांना आणि ५७ पा्यांमधील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. त्यासाठी ४९ लाखांच्या तरतुदीचे नियोजन केले आहे.