खरवंदची पाणीटंचाई झाली आॅस्ट्रेलियन दातृत्वाने दूर
By admin | Published: December 14, 2015 12:41 AM2015-12-14T00:41:44+5:302015-12-14T00:41:44+5:30
या तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे
हुसेन मेमन, जव्हार
या तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले, खरवंद गाव आॅस्ट्रेलियन दाम्पंत्याच्या दातृत्वामुळे व आदिवासींच्या योगदानामुळे पाणीटंचाई मुक्त झाले आहे. त्यामुळे या गावातील महिलांचा आनंद गगनाला भिडला होता. हा चमत्कार घडला तो आॅस्ट्रेलियातील दानशूर कुमार कुटुंब व खरवंद गावातील आदिवासिंचे योगदान यामुळे या नळपाणी योजनेचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी १२.३० वाजता पार पडला. जव्हार तालुक्यापासून - १२ कि.मी. अंतरावर असलेल्या खरवंद गावात ७२ कुटुंबे आहेत. तर ३३३ लोकसंख्या आहे. स्वातंत्र्यपासून भीषण पाणीटंचाईने हे गाव ग्रस्त होते. त्याता डिसेंबर महिन्यापासूंनच तीव्र पाणीटंचाई सुरु व्हायची, व येथील महिलांना रात्री-बेरात्री जागून पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासी महिलांना रोज ५ ते ६ तास वणवण करावी लागयची. ती आता या पाणीयोजनेमुळे संपुष्टात आली आहे. तसेच गावच्या श्रमदानाचाही तिला हातभार लागला आहे. या प्रयोगाचे अनुकरण सर्वत्र व्हावे अशी अपेक्षा आहे.
आॅस्ट्रेलियातील- मुरली कुमार व त्याची पत्नी- वंदना मुरली कुमार यांच्या कुटुंबांने, मनाच्या समाधानासाठी जव्हार खरवंद गावात आज नळपाणी पाणीपुरवठा योजनेचा सुभारंभ केला. या योजनेसाठी, त्यांनी ५ लाखांची देणगी दिली आहे. या देणगीतून व ग्रामस्थांनी एकत्र येवून स्वयंम ग्राम पाणीपुरवठा लोकसहभागातून तिचा शुभारंभ आज केला. त्यामुळे या गावाला मुबलक पाणी मिळू लागले आहे. वर्षानुवर्षे असलेली पाणीटंचाई जशी यामुळे दूर झाली आहे. तसेच दूषित पाण्यामुळे गावात फैलावणारी रोगराईदेखील टळली आहे.याप्रसंगी कुमार कुटुंब, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष- सुरेखा थेतले, जव्हार पंस. सभापती- ज्योती भोये, वनवासी कल्याण आश्रम मुंबईचे काचारेकर, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रचे व भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस- हरिचंद्र भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य- विनायक राऊत, ग्रामदान मंडळ जामसर -विठठल थेतले, योगेश भोये, स्वयम ग्राम नळपाणी योजना तथा खरवंद समिती उपस्थित होते.