मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:47 AM2019-04-22T00:47:30+5:302019-04-22T06:48:21+5:30

; लोकप्रतिनिधी उदासीन

Water shortage in 5th phase | मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

मोखाड्यात ५ धरणे असूनही पाणीटंचाई; जलयुक्त शिवार योजना फसली

googlenewsNext

मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्ती मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून तोकडे प्रयत्न होत असल्याने आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट अजूनही थांबलेली नाही नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, फसलेली जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकरयुक्त गावाची संख्या दरवर्षी कमी होण्या ऐवजी वाढत चालली असून हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने उमेदवार मागतात मते मतदार मागतात पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष असल्याने मोखाडा वासीयांच्या पदरी पाणी टंचाईचे संकट कायम असून पाच मोठी धरणे उशाला असूनही लोकप्रतिनिधी व येथील प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.



तसेच गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पासून टंचाईग्रस्त गाव पाड्े २०-२५ किलो मिटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे टंचाई ग्रस्त नागरिकांना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर टँकर चालु असलेल्या गाव पाड्यांतील जनतेला चातक पक्षा प्रमाणे टँकरची दिवसभर वाट बघावी लागत असून मोलमजूरी करुन पोटाची खळगी भरणाºया आदिवासी बांधवाची मोठी अडचण झाली आहे.

दरवर्षीच डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वासून एप्रिल- मे मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो आज घडीला तालुक्यातील ७४ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने गावपाड्यांची तहान भागवली जात आहे दरवर्षी टँकरच्या नावाखाली करोडोचा खर्च केला जात असतांना निवडणुकीच्या काळात टँकर मुक्तीच्या आश्वासनांचा पाऊस पाडणाºया राजकीय पुढाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याचा कायमचा विसर पडला असल्याने स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही.



लाखाच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या पोहचली असून तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा, अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे या धरणावर करोडोंचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणी टंचाई उग्र होत असते यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि मी अंतरावर शासनाने पाणी पोहचवले आहे परंतु धरणा लगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील धरणांचे पाणी मुंबईला नेणाºया सरकारला धरणांच्या जवळपास असलेल्या या तालुक्यातील गावांना का पुरवता येत नाही असा जनतेचा सवाल आहे.

Web Title: Water shortage in 5th phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.