जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील २२० गांवपाड्यात तीव्र पाणी टंचाई , ३९ टँकरच्या फे-या
By सुरेश लोखंडे | Published: May 8, 2023 07:45 PM2023-05-08T19:45:54+5:302023-05-08T19:46:03+5:30
जिल्ह्यातील शहराना पाणी पुरवणाºया शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यातील तब्बल २२० गांवपाड्यात सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. या गांवकºयांना १७ खासगी टँकरव्दारे तब्बल ३९ फेºयांव्दारे दैनंदिन पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये ५४ गांवांसह १६६ आदिवासी पाड्यांचा सामावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शहराना पाणी पुरवणाºया शहापूर तालुक्यातील १३४ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या ग्रामीण व दुर्गम भागातील गांवखेड्यांच्या ४० हजार ग्रामस्थांना आजरोजी ३२ खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी दहा जादा टँकर शहापूरच्या गांवखेड्यात धावत आहेत. सध्याच्या पाणी टंचाईच्या या कालावधीत ३५ गांव टंचाई ग्रस्त आहेत. त्यांपैकी २९ गांवाना पाणी पुरवठा होत आहे तर १४० पाड्यापैकी १३२ पाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहेत.
शहापूर तालुक्यातील तब्बल १७५ टंचाईग्रस्त गांवखेड्यांपैकी १६१ गांवपाड्यांना ३२ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातही पाच गांवे आणि आठ आदिवासी पाड्यांना पाच टँकरव्दार पाणी पुरवठा सुरू आहे. या १३ गांवपाड्यांच्या तब्बल नऊ हजार ६९० ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे. जीव घेण्या उन्हामुळे या गावातील महिला व गांवकºयांना पाणी पुरवठा करणाºया टँकरची चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत आहे. टँकर येताच अल्प वेळेत त्यातील पाणी संपत आहे. तर काही टँकर विहिरींमध्ये पाणी सोडत असले तरी त्या विहिरीवर ग्रामस्थ, महिला प्रचंड गर्दी करून पाणी समस्येला तोंड देत आहेत.