केडीएमसी हद्दीत महिन्यातून दोनदा पाण्याचे शटडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:41+5:302021-03-06T04:38:41+5:30

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवार, ९ मार्चपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार ...

Water shutdown twice a month in KDMC limits | केडीएमसी हद्दीत महिन्यातून दोनदा पाण्याचे शटडाउन

केडीएमसी हद्दीत महिन्यातून दोनदा पाण्याचे शटडाउन

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवार, ९ मार्चपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जलस्रोतांमधील उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरावे, यासाठी ठाण्यातील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १२ जानेवारीला उल्हास नदी पाणी नियोजन २०२०-२१ करिता घेतलेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी सलग २४ तास केडीएमसी क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवार, ९ मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन दुसऱ्या व चौथ्या मंगळवारपूर्वी योग्य तो पाणीसाठा करून ठेवावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

-------------------

Web Title: Water shutdown twice a month in KDMC limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.