कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:00 AM2018-09-27T05:00:40+5:302018-09-27T05:01:16+5:30

मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे.

Water sports throws at more than fifty places in Konkan | कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सचा थरार

कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सचा थरार

Next

- नारायण जाधव
ठाणे  - मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे. यात जेटकिंगसह पॅरासेलिंग, स्कायकिंग, बनाना राइड, वॉटर रॉफिटंगचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यामुळे वॉटर रॉफिटंगसाठी केरळ, गोवा किंवा काश्मिरी-हिमाचलमधील नद्यांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला असून इच्छुकांकडून सहा जिल्ह्यांतील खाडी व समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणांची यादी देऊन त्यासाठी प्रस्ताव मागवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे महापालिकेने तर गायमुख येथे त्यादृष्टीने तयारीही चालवली आहे.
कोकणातील पर्यटनवाढीसह स्थानिकांना रोजगार मिळावा, पर्यटकांना बीचमध्ये डुंबण्यासह करमणुकीसह वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवता यावा, हा मेरीटाइम बोर्डाचा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र जलक्रीडा धोरण-२०१५ नुसार मेरीटाइम बोर्डाने यापूर्वी काही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स सुरूही केले आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून जलक्रीडा प्रकल्प राबवण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीलाच इच्छुकांकडून बोर्डाने प्रस्ताव मागवले आहेत. तज्ज्ञ मनुष्यबळ, जलक्रीडांसाठी आवश्यक असलेली साधनसामग्रीची उपलब्धता, तांत्रिक कर्मचारी, आर्थिक क्षमता या बाबी तपासून मेरीटाइम बोर्ड इच्छुक संस्थांना त्यात्या ठिकाणी आवश्यक ते सहकार्य करून परवानगी देणार असल्याचे ही सूत्रे म्हणाली.
हे असणार वॉटर स्पोर्ट्स
जेटकिंगसह पॅरासेलिंग, स्कायकिंग, बनाना राइड, वॉटर रॉफिटंग, पॉवर बोट, बेअरफूट स्किंग, विंड सफरिंग, स्क्रूफिंग, केबल स्किलिंग, वेक बोर्डिंग, कॅनॉर्इंग, डिंग्घी सेलिंग, स्काइट सफरिंग, भरतीच्या लाटांवर आरूढ होऊन धाडसाचा प्रत्यय आणून देणारी स्किम बोर्डिंग यांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी असलेली जागेची उपलब्धता, पाण्याच्या स्वच्छतेची पातळी, खोली यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या जलक्रीडांना परवानगी देणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

येथे पाहायला मिळणार वॉटर स्पोर्ट्सची धूम

मुंबई उपनगरे- मार्वे, मनोरी, वर्सोवा, जुहूतारा बीच, ठाणे- उत्तन, मोठागाव रेतीबंदर, गायमुख, नागलाबंदर, भार्इंदर पूर्व-पश्चिम जेट्टी सुरूची बाग, घोडबंदर, नागलाबंदर, पालघर- डहाणू, तारापूर, सातपाटी, केळवा, माहीम, अर्नाळा, रायगड- मोरा, नागाव, पिरवाडी, आक्षी, रेवदंडा, पालव, थेरांडा, मुरूड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर. रत्नागिरी- आरेवारे, भाट्ये, गुहागर, मालगुंंड, गणपतीपुळे, कर्दे, तिवरी, नेवरे, भातगाव, वेळणेश्वर, दाभोळ, अंजर्ला, लाडघर, हर्णे, केळशी, बाणकोट, सुवर्णदुर्ग, जैतापूर सिंधुदुर्ग- किरपाणी, रेडी, वेंगुर्ला, निवती, मालवण, आचरा, देवगड, विजयदुर्ग

Web Title: Water sports throws at more than fifty places in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.