सोमवारी नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
By अजित मांडके | Updated: July 12, 2024 22:15 IST2024-07-12T22:15:43+5:302024-07-12T22:15:57+5:30
या शटडाऊन कालावधीत कोपरी आनंदनगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

सोमवारी नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नौपाडा-कोपरी प्रभाग समिती मधील कोपरी आनंदनगर येथील बीएमसी विभागामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनीवर बायपास यंत्रणा कार्यान्वित तसेच जोडणी करणेचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी नौपाडा कोपरी प्रभागसमितीमधील काही भागांचा पाणीपुरवठा सोमवारी सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यत १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊन कालावधीत कोपरी आनंदनगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.