ठाणे शहरातील काही भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:03+5:302021-09-21T04:46:03+5:30

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी, तसेच इतर अत्यावश्यक कामे ...

Water supply will be cut off in some parts of Thane city | ठाणे शहरातील काही भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

ठाणे शहरातील काही भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी, तसेच इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Web Title: Water supply will be cut off in some parts of Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.