ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा
By अजित मांडके | Published: March 18, 2024 06:57 PM2024-03-18T18:57:34+5:302024-03-18T18:57:49+5:30
महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या बुधवारी सकाळी ९ वा ते रात्री ९ वा पर्यंत असा १२ तासासाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शन पर्यंत महापालिकेच्या दोन मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्र.एनएच -३ च्या रुंदीकरणामध्ये बाधीत होत आहेत. त्यामुळे या कामात अडथळा येत असून हे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या बुधवारी सकाळी ९ वा ते रात्री ९ वा पर्यंत असा १२ तासासाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरविण्यात येणारा पाणी पुरवठा ३०% ने कमी होणार आहे. त्याअनुषंगाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनींग करुन पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.