शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार
By अजित मांडके | Published: April 23, 2024 03:00 PM2024-04-23T15:00:44+5:302024-04-23T15:01:07+5:30
या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
या शट डाऊनच्या काळात, शुक्रवारी सकाळी ९ ते शुक्रवारी रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईप लाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी सकाळी ९ या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील.
या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.