आर्थिक संकटामुळे दुधाऐवजी बनवले पाण्याचे सरबत, मोहरमच्या दिवशी पाळली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:04 AM2020-08-31T02:04:23+5:302020-08-31T02:08:11+5:30

सत्यवचनी व सदाचारी असलेले इमाम हुसेन हे ७२ सहकाऱ्यांसह सध्याच्या इराकमधील करबला येथे इस्लाम धर्मासाठी पाण्यावाचून शहीद झाले होते.

Water syrup made instead of milk due to financial crisis, a tradition observed on the day of Moharram | आर्थिक संकटामुळे दुधाऐवजी बनवले पाण्याचे सरबत, मोहरमच्या दिवशी पाळली परंपरा

आर्थिक संकटामुळे दुधाऐवजी बनवले पाण्याचे सरबत, मोहरमच्या दिवशी पाळली परंपरा

Next

- कुमार बडदे

मुंब्रा : लॉकडाऊनमुळे रोजगार गमावला, आर्थिक चणचण जाणवू लागली. मात्र, तरीही येथील मुस्लिम बांधवांनी रविवारी मोहरमनिमित्त सरबत बनवण्याकरिता दुधाऐवजी चक्क पाण्याचा वापर केला. काहींनी नेहमीपेक्षा कमी दुधाचा वापर करून सरबत केले. हिंदूंच्या सणांइतकाच मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांनाही फटका बसला आहे. मात्र, बिकट परिस्थितीतही परंपरांचे पालन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
सत्यवचनी व सदाचारी असलेले इमाम हुसेन हे ७२ सहकाऱ्यांसह सध्याच्या इराकमधील करबला येथे इस्लाम धर्मासाठी पाण्यावाचून शहीद झाले होते. त्यांच्यासारखे पाण्यावाचून कुणीही वंचित राहू नये, यासाठी मोहरमच्या दिवशी दुधापासून बनविलेल्या विविध प्रकारच्या सरबताचे वाटप केले जाते. तत्पूर्वी १० दिवस आधी ठिकठिकाणी शबील बनवून तेथे माठांमध्ये पिण्याचे पाणी साठवले जाते. सरबत बनविण्यासाठी लागणारे दूध रात्रभर तापवून सकाळी त्याचे सरबत करून वाटप केले जाते. यासाठी होणाºया खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी वर्गणी गोळा केली जाते. त्यातून जमा होणाºया पैशांतून दूध व इतर साहित्य खरेदी करून सरबत बनवले जाते. परंतु, यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक मुस्लिम कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. दुबई किंवा आखातात नोकरीनिमित्त गेलेल्यांच्या नोकºया गेल्याने तेही परत आले आहेत. व्यवसाय करणाºया मुस्लिम कुटुंबांवर सध्या चरितार्थ कसा चालवायचा, अशी पाळी आली आहे. बहुतांश सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळे, अनेकांनी वर्गणी देताना हात आखडता घेतल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा वर्गणी जमा झाली नाही. यामुळे प्रत्येक वर्षी १५०० लीटर दुधाचे सरबत बनवणाºया ‘वारसी’ या मंडळाने यावर्षी फक्त २५० लीटर दुधाचे सरबत बनवले, अशी माहिती आयशा शेख हिने दिली. यंदा दुधाऐवजी सरबतासाठी पाणी वापरल्याचे अन्य एका तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

पाणी शिंपडून विसर्जन
ताजियांच्या मिरवणुकीला परवानगी नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी ताजिया जेथे बसविले होते, तेथेच पाणी शिंपडून त्यांचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Water syrup made instead of milk due to financial crisis, a tradition observed on the day of Moharram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.