टँकरने पाण्याचा मारा; पालिकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:56 PM2018-11-02T23:56:32+5:302018-11-02T23:56:34+5:30

शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कल्याण रोडवर मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी करूनही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता बनवलेला नाही.

Water tanker hit; The unique management of the corporation | टँकरने पाण्याचा मारा; पालिकेचा अजब कारभार

टँकरने पाण्याचा मारा; पालिकेचा अजब कारभार

Next

भिवंडी : शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या कल्याण रोडवर मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी करूनही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता बनवलेला नाही. त्यामुळे या अशा रस्त्यामधून उडणाºया धुळीने येथील व्यापारी व रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून टँकरने रस्त्यावर पाणीफवारणी करत आहेत.

शहरातील राजीव गांधी ते कल्याण रोड साईबाबा बायपास या मार्गावर काँक्रिटचा रस्ता बनवणे आणि उड्डाणपूल बनवण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात हा रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने ठिकठिकाणी खड्डे झाले होते. दरम्यान, उड्डाणपुलाचेही काम सुरू
आहे.

त्यामुळे काँक्रिटचा रस्ता बनवण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या रस्त्यावर डांबराचे पॅच मारून खड्डे बुजवणे आणि वाहने चालवण्यायोग्य रस्ता बनवण्यासाठी ८० लाख रुपये एमएमआरडीएमार्फत खर्च केल्याचे सांगितले जाते. परंतु, हे काम योग्य रीतीने न झाल्याने मोठ्या प्रमाणात माती व खडीचे साम्राज्य पसरले. तसेच नादुरुस्त रस्ता अधिक त्रासदायक होऊन त्यामधून धूळ उडणे सुरू झाले आहे. या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांना कोंडीबरोबर रस्त्यावर साचलेल्या धुळीचा सामना करावा लागत आहे.

वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. तर, काही नागरिक व व्यापारी आजारी पडले आहेत. महापालिकेने हा रस्ता दुरुस्त करावा, याबाबत नागरिकांसह सामाजिक सेवा संस्थांनी महापालिकेस लेखी पत्र दिले आहे. मात्र, हा रस्ता एमएमआरडीएकडे असल्याने पालिका प्रशासन हा रस्ता दुरुस्त करू शकत नाही, असे सांगून पालिकेने हात वर केले आहेत.

पालिकेचे एमएमआरडीएला पत्र
ही बाब आयुक्त मनोहर हिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांच्या मागणीवरून धूळ उडू नये, म्हणून दररोज एका टँकरमधून या रस्त्यावर पाणी टाकले जाते. तसेच हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, याबाबत आयुक्तांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना लेखी पत्र दिले आहे.

Web Title: Water tanker hit; The unique management of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.