ठाणेच्या खाडी किनारी दुपारी 4 मीटरपर्यंत लाटा उसळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:53 AM2020-07-27T10:53:49+5:302020-07-27T10:53:59+5:30
जिल्ह्यात आजही तुरळक पाऊस पडला. 24 तासाच्या कावधीत 42.60 मिमी पाऊस पडला असता त्यात सर्वाधिक ठाणे तालुक्यात 36 मिमी पाऊस पडलेला आहे.
ठाणे: जिल्ह्यात गेल्या 24 तासाच्या कालावधीत अवघा 42.60 मिमी पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊसठाणे शहर परिसरात 3626 मिमी पाऊस पडला आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे खाडीला भरती येणार आहे. या दरम्यान 4.49 मीटरपर्यंत लाटा खाडी किनारी उसळणार आहेत. यास अनुसरुन खाडी किनारी न जाण्याच्या आवाहनासह आपत्ती नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचे मार्गदर्शन ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने केले आहे.
दडी मारुन बसलेला पाऊस जिल्ह्यात रिमझिम पडत आहे. ठिकठिकाणी तुरळक पडणाऱ्या या ठाणे शहर परिसरात 36.26 मिमी पाऊस 24 तासात पडला. या दरम्यान आगीच्या दोन किरकोळ घटनांसह चरई, खारीगांव येथे झाडाच्या फांद्या तुटल्याची घटना घडल्याच्या दोन तक्रारी आहेत. तर पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन लिकेज झाल्याची एक तक्रार आहे. खाडी किनारी उसळणाऱ्या या लाटा 5 वाजेपर्यंत किनार्यावर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आजही तुरळक पाऊस पडला. 24 तासाच्या कावधीत 42.60 मिमी पाऊस पडला असता त्यात सर्वाधिक ठाणे तालुक्यात 36 मिमी पाऊस पडलेला आहे. सरासरी 6 मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ही तुरळक पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आलेली आहे.