आम्ही तुमच्या सोबत! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा कोरोनातील ४३ अनाथ बालकांना धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:52 PM2022-05-30T17:52:54+5:302022-05-30T17:53:14+5:30

तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी या आॅनलाइन कार्यक्रमाव्दारे बालकांना उद्देशून दिला.

We are with you! Thane District Collector reassures 43 orphans in Corona | आम्ही तुमच्या सोबत! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा कोरोनातील ४३ अनाथ बालकांना धीर

आम्ही तुमच्या सोबत! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा कोरोनातील ४३ अनाथ बालकांना धीर

Next

ठाणे - कोरोनामुळे पालक गमावलेल्या ठाणे जिल्ह्यातील ४३ बालकांसह देशभरातील अनाथ बालकांना ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन’ या योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सोमवारी महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील या ३० बालकांनी या सोहळ्यांचा आनंद घेतला. 

यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबूक आणि पंतप्रधानांचे पत्र आदी साहित्य देऊन चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा, समाज आपल्या सोबत आहे, तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही आहोत, असा अनमोल दिलासाही त्यांनी यावेळी बालकांना दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पंतप्रधानाच्या या ऑनलाईन कार्यक्रमलाला सकाळी आमदार कुमार आयलानी, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, स्माईल फाऊंडेशनच्या उमा आहुजा आदी उपस्थित होते. तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी या आॅनलाइन कार्यक्रमाव्दारे बालकांना उद्देशून दिला.

कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या सुमारे ४३ आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी ३० जणांची उपस्थिती होती. पासबूकसह, पंतप्रधानाचे पत्र विमा काड आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरितांचे साहित्या त्यांच्या बालकांच्या सांभाळकर्त्यांना यावेळी देण्यात आले. आम्ही तुमच्या सोबत आहोत, चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बालकांना दिला.

Web Title: We are with you! Thane District Collector reassures 43 orphans in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.