महाडमधील पूरग्रस्तांना ‘वुई आर फॉर यू’चा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:58+5:302021-08-01T04:36:58+5:30
ठाणे : ‘पुढे करुनी मदतीचा हात, पूरग्रस्तांना देऊया आपुलकीची साथ’ म्हणत आदित्य प्रतिष्ठान, ठाणेच्या वुई आर फॉर यू, नौपाडा ...
ठाणे : ‘पुढे करुनी मदतीचा हात, पूरग्रस्तांना देऊया आपुलकीची साथ’ म्हणत आदित्य प्रतिष्ठान, ठाणेच्या वुई आर फॉर यू, नौपाडा युथ, अभिनय कट्टा, संगीत कट्ट्याच्यावतीने २७ जुलैला पहिली मदतफेरी महाडला गेली हाेती. मदतीच्या पहिल्या टप्प्यावर जवळपास साडेचार हजार पाण्याच्या बाटल्या आणि २५०-३०० जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात आले.
प्रतिष्ठानच्यावतीने केलेल्या आवाहनाला अल्पावधीत दानशूर ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. संस्थेच्या माध्यमातून पहिल्या मदतफेरीसाठी ट्रक भरून सामान महाडमध्ये पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले. या कार्यात महाड येथील स्थानिक असलेला अभिनय कट्ट्याचा कलाकार रोहित सुतार याने मोलाची भूमिका बजावली. त्या लोकांना आदित्य प्रतिष्ठान, ठाणेच्या वुई आर फॉर यूच्या माध्यमातून थेट मदत वितरित करण्यात आली. त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले, असे किरण नाकती यांनी सांगितले. आदित्य प्रतिष्ठान, ठाणेच्या वुई आर फॉर यू, नौपाडा युथ, अभिनय कट्टा, संगीत कट्टा, नौपाडामधील स्थानिक नागरिकांनी कमी वेळेत जमा झालेल्या वस्तूंचे वर्गीकरण करूत त्यांचे कीट बनवले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाकती यांच्या नेतृत्वाखाली गजानन परब, प्रशांत भरणे, महेश सुतार, लक्ष्मण पेडणेकर, विजय डावरे, आदित्य नाकती, कौस्तुभ राऊत, बाळा पावसकर, ऋषिकेश केदार, महाडमधील स्थानिक आदींनी सहभागी होत थेट पूरग्रस्तांना मदत पोहाेचवली.
चिपळूण, सांगली, काेल्हापूरसाठी गुरुवारी मदतफेरी
प्रतिष्ठानच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदतीची फेरी ५ ऑगस्टला चिपळूण आणि सांगली, कोल्हापूरसाठी रवाना होणार आहे. या फेरीत ‘मायेची खिचडी’ याअंतर्गत किमान एक महिना पुरेल असे अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तरी दात्यांनी या वस्तू ४ ऑगस्ट २०२१ दुपारी १२ वाजेपर्यंत आदित्य प्रतिष्ठान, ठाणे, अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे (प.) येथे देण्याचे आवाहन आदित्य प्रतिष्ठान, ठाण्याच्या वुई आर फॉर यूच्यावतीने करण्यात आले आहे.
-----------------
फोटो मेलवर