Eknath Shinde: शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पवारांच्या विधानावर CM शिंदे म्हणाले...कोणतंच राजकारण नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 03:30 PM2022-07-13T15:30:32+5:302022-07-13T15:31:27+5:30

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं.

we dont want any other politics now says cm shinde on sharad pawar statement about ncp and shiv sena alliance | Eknath Shinde: शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पवारांच्या विधानावर CM शिंदे म्हणाले...कोणतंच राजकारण नको!

Eknath Shinde: शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पवारांच्या विधानावर CM शिंदे म्हणाले...कोणतंच राजकारण नको!

Next

ठाणे-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट देऊन एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतलं. यानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीवार्दानेच मुख्यमंत्री झालेलो आहोत अशी भावना व्यक्त केली. 

'कुणी सोबत येवो न येवो, तयारीला लागा', शरद पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आली तर एक वेगळं चित्र राज्यात पाहायला मिळू शकतं असं विधान केलं होतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत असं कोणतंच राजकारण आम्हाला नको असं म्हटलं आहे. "शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांचा नक्कीच आम्ही आदर करतो. पण आज जे ५० आमदार वेगळ्या भूमिकेतून एकत्र आले आहेत. ती भूमिका हिंदुत्वाची आहे. आता पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आणखी नेते सोबत येत आहेत. आम्हाला दुसरं बाकी काहीच राजकारण करायचं नाही. राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचं टार्गेट आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

'गुरुं'मुळेच मी मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळेच आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक मुख्यमंत्री होऊ शकला. आज आम्ही त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जात आहोत. राज्यातील कष्टकरी, दुर्बल घटकांचं हे सरकार आहे. राज्यातील प्रत्येक घटकासाठी काम करणारं हे युतीचं सरकार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

उल्हासनगर, दिंडोरी अन् नाशिकचेही नगरसेवक सोबत
ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट दिली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक देखील उपस्थित होते. उल्हासनगर पालिकेतील १५ हून अधिक नगसेवकांनी देखील आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तसंच दिंडोरी, नाशिक इथूनही शिवसेनेचे नगरसेवक आमच्या पाठिशी असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

Web Title: we dont want any other politics now says cm shinde on sharad pawar statement about ncp and shiv sena alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.