‘आम्ही थापा नाही वचन देतो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:15 AM2017-08-18T03:15:46+5:302017-08-18T03:15:48+5:30
आम्ही थापा नाही, तर वचन देतो. मेट्रो प्रकल्पाची सुरूवात काँग्रेसने केली.
भार्इंदर : आम्ही थापा नाही, तर वचन देतो. मेट्रो प्रकल्पाची सुरूवात काँग्रेसने केली. पण ही मेट्रो मीरा-भार्इंदरमध्ये आणण्याचे काम शिवसेनेने केले. मुंबईत कमी झालेला मराठी टक्का मीरा-भार्इंदरमध्ये वाढला. पण हिंदी भाषक भवन आणून, इतर भाषकांचे लांगूलचालन करून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना त्यांच्या तंगड्या तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
जे मुंबई-ठाण्यात केले, तेच मीरा-भार्इंदरमध्ये करा आणि मतदानानंतर येथे फक्त भगवा फडकवा, अन्य कोणतेही फडके नको, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेतील लोकांना सामावून घेत, त्यांच्यावर अन्याय न करता बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसैनिक हा भडक डोक्याचा आहे. पण तो जिवाला जीव देणारा आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
आम्ही मुंबईत पेंग्विन आणले. पण त्यावर टीका झाली. त्यातील एक पेंग्विन मरण पावला. पण देशातील मुलांनी पेंग्विन पाहायचेच नाहीत का, असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस - राष्ट्रवादी हे आमचे वैचारिक दुश्मन आहेत. पण त्यांना सोडून ज्यांना निवडून दिले ते चांगले दिवस कधी आणणार असा सवाल ठाकरे यांनी केला.
आमदार प्रताप सरनाईक यांनीही मेट्रो, पाणी हे शिवसेनेमुळेच मिळणार असल्याचा दावा केला.
>मालमत्ता कर माफ : शिंदे
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर मीरा-भार्इंदरमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले. क्लस्टर आणि धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर शिवसेनेचे आमदार सभागृहात भांडले. त्यामुळे त्यांना पाच वेळा निलंबित व्हावे लागले, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नाही, तर लोकांशी आहे आणि शिवसेना फक्त निवडणुकीपुरते नाही, तर वर्षभर काम करते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
>वेडेवाकडे सेल्फी नकोत : सेल्फी काढण्याची क्रेझ तरूणांमध्ये असली तरी जीव धोक्यात घालून वेडेवाकडे सेल्फी काढू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. मुंबईत अशी सेल्फी काढण्याच्या नादात बुडणाºया तरूणींना वाचवण्यास गेलेल्याच्या पाठिशी शेवटी शिवसैनिकच उभा राहिल्याचा दाखलाही त्यांनी दिला.