भविष्यात सत्ता वाटपाच्या वेळी आम्हाला संधी दिली पाहिजे - जोगेंद्र कवाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 08:50 PM2019-12-31T20:50:19+5:302019-12-31T20:50:25+5:30
तरी भविष्यात ही संधी मिळेल ही आशा असल्याची माहिती पीपल रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे.
ठाणे - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्र पक्ष म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नसले तरी भविष्यात ही संधी मिळेल ही आशा असल्याची माहिती पीपल रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे. आघाडीच्या विजयात आणि पराभवात त्यांची साथ कधी सोडली नाही. त्यामुळे भविष्यात सत्ता वाटपाच्या वेळी आम्हाला संधी दिली गेली पाहिजे, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे .
भीमा-कोरेगावची घटना ही दंगल नसून दलित आणि बौद्धांवर हल्ला होता. त्याला सरकारची फूस होती, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे. दुसरीकडे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर देखील त्यांनी टीका केली असून, आठवले यांना कोणती भूमिका घ्यायची असेल तर ती मोदी आणि अमित शहा यांना विचारून घ्यावी लागेल, असा टोला देखील त्यांना लगावला. ठाण्यात एका खासगी कार्यक्रमात कवाडे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना त्यांनी प्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी, मित्र पक्ष म्हणून या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान देणे आवश्यक होते, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नसले तरी सरकार बाबत आपण आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार आमचे सरकार असून सामान कार्यक्र म विकासाची अंमलबजावणी कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे कवाडे यांनी सांगितले. सत्ता वाटपामध्ये महामंडळ आणि इतर महामंडळावर मित्र पक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील दोन नेते एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळात समावेश झाला तसेच बच्चू कडू, राजेंद्र एड्रावकर आणि नगर येथील अशा तीन मित्र पक्षाला समाविष्ट करून घेतले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घराणोशाहीचा आरोप करणो योग्य नसून तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचा त्यांनी सांगितले. मात्र मंत्रिपद देताना कर्तबगारी बघणो आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक:यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना शेतक:यांसाठी 2 लक्ष कर्जमाफी बाबत या सरकारने जी भूमिका घेतली आहे ते भाजप च्या सरकारला जमले नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपच्या काळात जे भयमुक्त वातावरण झाले होते ते या सरकारच्या काळात दूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव बाबत बोलताना ही घटना म्हणजे दलित आणि बौद्धांवर आरएसएस प्रणित हल्ला हल्ला होता असे त्यांनी सांगितले. एल्गार आणि भीमा कोरे गावचे प्रकरण हे दोन्ही वेगळे आहे त्यात भीमा कोरेगावाचे काय संबंध असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. नागरीकत्व कायदा हा देशाच्या विरुध्द कायदा देश विघातक कायदा आहे. हा देश सर्व सामन्याच्या देश असून देशाचे विभाजन करण्याचे काम आरएसएस करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.