असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:14 PM2022-09-04T13:14:06+5:302022-09-04T13:14:53+5:30

देवेंद्र फडणवीस व अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण...

We welcome dissidents in BJP, not interested in splitting the party says Raosaheb Danve | असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

Next

भिवंडी : भाजपला कोणताही दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात रस नाही. कोणताही पक्ष आम्ही स्वत:हून फोडत नाही. पण एखाद्या पक्षात फूट पडून त्यातून लोक आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. 

शुक्रवारी रात्री दानवे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडीतील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेही होते. याप्रसंगी पाटील यांच्या वतीने देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीसअशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण त्यांच्यामध्ये असंतोष असेल तर त्याचा आम्ही आता काही उपयोग करणारा नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल, उपयोग होईल असे वाटेल  तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ, आज आम्हाला कोणाची गरज नाही.

विचारांशी सहमत व्हावे
कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट असल्याने आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहे. केवळ त्यांनी आमच्या विचारांशी सहमत व्हावे, ही आमची अट आहे असे दानवे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.
 

Web Title: We welcome dissidents in BJP, not interested in splitting the party says Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.