वीकेण्ड आऊट आॅफ स्टेशन
By admin | Published: December 24, 2015 01:40 AM2015-12-24T01:40:41+5:302015-12-24T01:40:41+5:30
सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा मुहुर्त साधत ठाणेकरांनी आपला हॉलिडे विकेण्ड बाहेरगावी साजरा करण्याचे ठरविले असून, अनेकांनी त्यासाठी गोवा, अलिबाग व महाबळेश्वरची निवड केली आहे
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा मुहुर्त साधत ठाणेकरांनी आपला हॉलिडे विकेण्ड बाहेरगावी साजरा करण्याचे ठरविले असून, अनेकांनी त्यासाठी गोवा, अलिबाग व महाबळेश्वरची निवड केली आहे. गुरुवारपासून ठाणेकर आऊट आॅफ स्टेशन असणार आहेत.
२४ डिसेंबरला ईद, २५ डिसेंबर रोजी नाताळ, २६ डिसेंबरला चौथा शनिवार व २७ डिसेंबर रोजी रविवार अशा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सलग चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. या सरकारी सुट्यांमुळे शाळा-कॉलेजही बंद राहणार असल्याने कुटुंब-कबिल्यासह आनंद लुटण्यासाठी बहुतेकांनी बाहेरगावची वाट धरली आहे.
शहरापासून लांब असलेल्या ठिकाणी जाण्याचा पिकनिक प्लॅन केला आहे. थंडीचे दिवस,
न्यू इयर फिव्हर व खूप दिवसांनी आलेल्या सलग सुट्ट्या
अनेकांसाठी धम्माल मस्ती करण्यासाठी मेजवानी ठरली आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर झाला आहे.
रेल्वे गाड्या, खाजगी बसेस, वोल्वो सर्वच हाऊसफुल्ल झाले आहेत. गुरूवारपासून सुट्टी असल्याने काही जण २३ डिसेंबरला रात्रीच निघणार आहेत तर काहींनी २४ डिसेंबरला पहाटे निघण्याचा बेत आखला आहे. पिकनिक व्यतिरिक्त काही मित्र-मैत्रीणीच्या लग्नाला तर काही जणांनी नातेवाईकांकडेही जाण्याचे ठरविले आहे.