भिवंडीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय एकात्मतेची स्वागत यात्रा

By नितीन पंडित | Published: March 22, 2023 05:17 PM2023-03-22T17:17:52+5:302023-03-22T17:19:13+5:30

यामध्ये शेकडो विद्यार्थी लेझीम पथक ,ढोल पथक,झेंडा पथक घेऊन,राष्ट्रीय पुरुषांची वेशभूषा त्यासोबत पर्यावरण रक्षण,वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे देखावे, वृक्ष दिंडी घेऊन सहभागी झाले होते.

Welcome Yatra of National Integration was performed by school students of Padmashri Annasaheb Jadhav Vidyalaya in Bhiwandi | भिवंडीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय एकात्मतेची स्वागत यात्रा

भिवंडीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय एकात्मतेची स्वागत यात्रा

googlenewsNext

भिवंडी - गुढी पाडव्यानिमित्त धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,शेठ जुगीलाल पोद्दार इंग्लिश मीडियम स्कुल, मराठी प्राथमिक शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मता शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

          यामध्ये शेकडो विद्यार्थी लेझीम पथक ,ढोल पथक,झेंडा पथक घेऊन,राष्ट्रीय पुरुषांची वेशभूषा त्यासोबत पर्यावरण रक्षण,वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे देखावे, वृक्ष दिंडी घेऊन सहभागी झाले होते. या शोभा यात्रेत केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील,आमदार महेश चौघुले,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी,संस्थेचे प्रमुख पदाधिकारी अरुण जाधव,श्रीराम भोईर,सोन्या पाटील,मुख्याध्यापक सुधीर घागस यांसह अनेक मान्यवरांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदविला.तर पद्मानगर येथे स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी स्वागत यात्रेचे स्वागत करीत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना थंडपेयाची व्यवस्था केली होती.

Web Title: Welcome Yatra of National Integration was performed by school students of Padmashri Annasaheb Jadhav Vidyalaya in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.