कल्याण पूर्वेत बंडखोरांना ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:18 AM2019-10-25T01:18:22+5:302019-10-25T01:18:40+5:30
कल्याण : बंडखोरीमुळे कल्याण पूर्व मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे तर्क लावले जात होते. मात्र, हा ...
कल्याण : बंडखोरीमुळे कल्याण पूर्व मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे तर्क लावले जात होते. मात्र, हा गड भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी राखला आहे. शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचे त्यांना आव्हान होते. परंतु, गायकवाड यांनी १२ हजार २५७ मताधिक्यासह हॅट्ट्रिक साधली आहे. तसेच काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शैलेश तिवारी यांनाही मतदारांनीठेंगा दाखवल्याचे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.
कल्याण पूर्वेतील निवडणूक बंडखोरीमुळे चांगलीच गाजली. २०१४ च्या तुलनेत मतांची टक्केवारी घटल्याने ही मते एकूण १९ उमेदवारांपेक्षा कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता होती. मतदारसंघातील ३४६ मतदानकेंद्रांवर मतदान झाले. मात्र, मतमोजणी उल्हासनगरच्या व्हीटीसी ग्राउंडमधील बॅडमिंटन हॉलमध्ये झाली. १६ टेबलांवर मतमोजणीच्या २५ फेऱ्या पार पडल्या.
सकाळी ८.१५ ला मतमोजणीला प्रारंभ झाला, तेव्हा उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पहिल्या फेरीचा निकाल साधारण अर्ध्या तासात आला. या फेरीत गायकवाड यांना ७७२ मतांची आघाडी मिळाली, ती पुढच्या फेऱ्यांमध्येही चढत्या क्रमाने कायम राहिली. अखेर, २५ व्या फेरीपर्यंत त्यांना १२ हजार २५७ मतांपर्यंत आघाडी मिळाली. ज्यावेळी त्यांनी आठ हजारांच्या फरकाने मताधिक्य घेतले होते, तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. फक्त उर्वरित फेºया होऊन विजयी घोषणेची औपचारिकताच केवळ बाकी होती. आपला विजय निश्चित असल्याचे समजताच गायकवाड मतमोजणीकेंद्रावर आले.
अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे हे मतमोजणीच्या ठिकाणी फिरकलेच नाहीत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे पहिल्या फेरीपासून उपस्थित होते. मात्र, त्यांना पराभवाची चाहूल लागताच त्यांनीही तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी उशिरा मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर २िला. यात गायकवाड यांना ६० हजार ३३२ मते, बोडारे यांना ४८ हजार ७५ ही दुसºया, तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांना १६ हजार ७५७ इतकी मते मिळाली. नोटाला तीन हजार ६९० मते दिली. तीन मतदानयंत्रांमध्ये बिघाड मतमोजणी तीन ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे त्या यंत्रांमधील मतमोजणी दुरुस्तीनंतर अखेरच्या क्षणी करण्यात आली. त्यामुळे निकाल लांबल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.